इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. तिथल्या हॉस्पिटलमधून समोर येत असलेल्या वृत्तांमुळे शेजारील देशांचेही टेन्शन वाढले आहे. सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सादर केलेली आकडेवारी धक्कादायक आहे. प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, चीनच्या अधिकृत आकडेवारीमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या लपवली जात आहे. एका दिवसात तीन कोटींहून अधिक बाधितांची संख्या नोंदवली गेली असण्याची भीती प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. हा आकडा जगातील एका दिवसामधला सर्वाधिक आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आता भारतानेही याची खबरदारी घेतली आहे.
या विमानतळांवर RTPCR तपासणी सुरू
चीनसह अन्य देशातील कोरोना स्थितीची दखल घेत भारतामध्येही पावले उलचण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, इंदूर आणि गोवा यासह विविध विमानतळांवर सकाळी प्रवाशांचे RTPCR कोविड स्क्रीनिंग सुरू झाले आहे. याशिवाय कोरोनाच्या विविध नियमांचे पालन आम्ही करीत आहोत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या पाच देशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध
जगभरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, चीन, जपान, हाँगकाँग, बँकॉक आणि दक्षिण कोरियामधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल. याबाबत लवकरच सविस्तर आदेश काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
https://twitter.com/mansukhmandviya/status/1606564610756472833?s=20&t=pbnZn9wK4YOPS97EPafUGw
Covid Restrictions India Passengers 5 Countries