गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चिंताजनक! कोरोनाचा अल्पवयीन मुलींवर परिणाम; ५ ते ९ वर्षांच्या मुलींमध्ये मासिक पाळीचे चक्र सुरू

नोव्हेंबर 20, 2022 | 5:31 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  करोना होऊन गेलेल्या अनेक रुग्णांमध्ये अजूनही विविध लक्षणे बघायला मिळत असतानाच यासंबंधी आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. करोनामुळे अनेक पौगंडावस्थेतील मुलींच्या मासिक पाळी येण्याच्या चक्राला धक्का बसला आहे. देशात अशी अनेक प्रकरणे आता समोर येत असून, यामध्ये ५ वर्षांपासून ९ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे.

गेले अडीच वर्ष सुरु असलेल्या करोना महामारीमुळे सर्वच बेजार झाले आहेत. त्यातच या आजारामुळे इतर अनेक आजार होण्याचा धोकाही अनेक पटींनी वाढला आहे. इंडिया टुडेच्या नवीन रिपोर्टनुसार कोरोना होऊन गेलेल्या ५ वर्षांपासून ९ वर्षांच्या मुलींच्या मासिक पाळीचे चक्र विस्कळीत झाले आहेत. यासंदर्भात पेडियाट्रिक एंडोक्रिनोलॉजिस्ट सुद्धा चिंतेत आहेत.

डॉक्टरांनी सांगितले की, जेव्हा मुलींची पौडांगावस्थेतून तारुण्याकडे जाण्यास सुरुवात होते, तेव्हा त्यांना मासिक पाळी येणे सामान्य असते. मात्र कमी वयातच मासिक पाळी येणे हे खूप घातक आहे. याचा मुलींच्या शरीरावर तसेच मनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. यामुळे पालकांमध्येही मानसिक तणाव वाढू शकतो. डॉ. सेठी यांनी सांगितले की आधी अशी १० प्रकरणे पाहायला मिळायची, मात्र आता त्यांची संख्या वाढून ३० पर्यंत पोहोचली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या मुलीलाही पाळी आल्याचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीत मुलींमध्ये लवकर यौवन येण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ दिसून आली आहे.

मानसिक तणाव वाढवणारी परिस्थिती
अगदी लहान वयातच आलेले यौवन हे रुग्णांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठीही क्लेशकारक परिस्थिती निर्माण करू शकते. यौवनामुळे हार्मोन्सची पातळी बदलते, त्यामुळे रुग्णाच्या भावनांवर त्याचा परिणाम होतो. कमी वयातील मुलींसाठी रक्त पाहणे अत्यंत भीतीदायक असू शकते. या मुली मासिक पाळीचा कालावधी हाताळण्यासाठी पुरेशा परिपक्व नसतात. अशावेळी त्यांना त्यांच्या बदलत्या शरीराबद्दल आणि विरुद्ध लिंग यांच्याशी संवाद साधण्याच्या परिणामाची जाणीव करून देणे गरजेचे ठरते. अशा परिस्थितीत चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक शिकवण्यापेक्षा नको असलेली गर्भधारणा याबद्दल मुलींना समजावणे हे पालकांबरोबरच बाल मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशकांसाठीही अतिशय कठीण ठरू शकते.

३० टक्के मुलींमध्ये लक्षणे
मानसिक धक्क्याबरोबरच अशा समस्येला सामोरे जाणाऱ्या लहान वयातील मुलींना अनेक शारीरिक परिणामांनाही सामोरे जावे लागते. यातीलच एक समस्या म्हणजे मुलींची कमी झालेली उंची. लहान मुले, विशेषत: मुलींची वाढ यौवनाच्या प्रारंभीच होते, परंतु मासिक पाळीनंतर त्यांची वाढ थांबते. त्याचबरोबर लवकर यौवन अनुभवणाऱ्या ३० टक्के मुलींमध्ये नंतर पीसीओडीची लक्षणे दिसून येतात. तसेच या मुलींना, उच्च इस्ट्रोजेन पातळीच्या वाढीव संपर्कामुळे अनुवांशिक पूर्वस्थिती किंवा कौटुंबिक इतिहास असल्यास स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

इतर देशांमध्येही जाणवतेय समस्या
अवेळी मासिक पाळी येण्याच्या समस्येशी लढा देणारा भारत हा एकमेव देश नाही. तुर्की, इटली, अमेरिका यांच्यासह इतर अनेक देशांमधील मुलीं अशा प्रकारच्या हार्मोनल असंतुलनाला बळी पडत आहेत. इटालियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की कोविड महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

Covid Minor Girl Menstrual Cycle Puberty
Harmonal Changes Health

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रद्धाच्या हत्येचा परिणाम : वसईत नवविवाहित हिंदू-मुस्लिम जोडप्याचे रिसेप्शन रद्द

Next Post

‘त्या’ प्राध्यापकाने बेधुंद अवस्थेत भरधाव कार का चालवली? पोलिसांसमोर केला हा धक्कादायक खुलासा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
accident 2

'त्या' प्राध्यापकाने बेधुंद अवस्थेत भरधाव कार का चालवली? पोलिसांसमोर केला हा धक्कादायक खुलासा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011