सावधान! भारतासाठी आगामी काळ कसोटीचा; बघा, ऑक्सफोर्ड काय म्हणतेय…

नवी दिल्ली/मुंबई – कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असल्यामुळे पुढील काही महिने भारतासाठी कसोटीचे आहेतकोरोनामुळेच आर्थिक सुधारणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहेऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सचे म्हणणे आहे कीभारतात लसीकरणाची मोहीम अतिशय संथगतीने सुरू आहे आणि संक्रमण रोखण्यासाठी हे पुरेसे नाहीऑक्सफोर्डचे हे निरीक्षण भारतीयांना आश्चर्याचे वाटू शकतेमात्र लसीकरणाच्या बाबतीत अद्याप जनजागृती पाहिजे तशी झालेली नाही.
कोरोनाचा प्रभाव अत्यंत मर्यादित आहे आणि अर्थव्यवस्था आपल्या पूर्ण क्षमतेने पुढे जात आहेमात्र नियोजन आयोगापुढे आता कुठलाही उपाय उरलेला नाहीप्रत्येक राज्य सरकार लॉकडाऊन टाळण्याचा प्रयत्न करीत आहेअशात गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा आर्थिक प्रभाव कमी असेलआरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आणि व्यापक निर्बंध लावण्यात आले तर मात्र परिस्थिती बिघडू शकतेगेल्या मंगळवारी आंतरराष्ट्रीय मुद्राकोषने २०२१ मध्ये भारताचा विकास दर १२.५ टक्के राहीलअशी आशा व्यक्त केली आहे.
अर्थव्यवस्था कोलमडेल?
भारतात दुसरी लाट अधिक व्यापक होत आहेत्यामुळे येत्या काळात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहेत्यामुळे २०२० प्रमाणे अर्थव्यवस्था कोलमडेलअसे म्हणता येणार नाहीपण लॉकडाऊनवर सारेकाही अवलंबून आहेकारण संक्रमण रोखण्यासाठी ज्या देशांनी लॉकडाऊन लावलेले नव्हते त्यांची परिस्थिती लॉकडाऊन लावणाऱ्या देशांच्या तुलनेत फारशी चांगली नाही.