नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी फिरोज उर्फ बब्बू मुस्तकीस शेख याला न्यायालयाने सोमवापर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. खंडणीसह मोक्कान्वये कारवाईत तो फरार होता. त्याला सातपूर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने सोमवार (दि.२३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फिरोज उर्फ बब्बू मुस्तकीस शेख (रा.रेणूका रेसि.दत्तात्रेयनगर,अमृतधाम) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. भाजपा पदाधिकारी सुदाम नागरे यांच्या घरावर हल्ला करून टोळक्याने खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयितासह त्याच्यासाथीदारांवर खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. घटनेपासून संशयित पसार होता. गेली तीन महिने पोलिस त्याच्या मागावर असतांना खबºयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास बेड्या ठोकण्यात आल्या. संशयितास विशेष मोक्का न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सातपूरचे प्रभारी निरीक्षक सतिष घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलिस नाईक दिपक खरपडे,संभाजी जाधव,गोकुळ कासार,सागर गुंजाळ आदींच्या पथकाने केली.