नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरात चॅापर लपवून ठेवणा-या एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष साध्या कारावासाची आणि अकरा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सोनल उर्फ लाला रोहिदास भडांगे ( २९ रा.मोरे मळा रामनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी कोर्ट क्र.८ चे न्या.प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात चालला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात पोलिस आयुक्त आदेश उल्लंघन तसेच भारतीय हत्यार आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हादाखल करण्यात आला होता. भडांग याने गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आपल्या घरात धारदार चॅापर लपवून ठेवल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ७ ऑक्टोबर २०२० रोजी छापा टाकला असता घरझडतीत चॅापर मिळून आला होता. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एस.सी.कासर्ले यानी केला. सरकार तर्फे अॅड. जी.आर.बोरसे यानी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व सरकार पक्षाच्या वतीने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीस तीन वर्ष साधा कारावास आणि अकरा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.