इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – न्यायाधीश हा शब्द उच्चारताच गंभीर चेहरा, शिस्तबद्ध रुबाबदारपणा असेच काहीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यातच न्यायाधीश खुर्चीत बसले असतील तर त्यांचा रुतबा काही औरच असतो. कोर्टातील जराशी बेशिस्तही खपवून घेतली जात नाही. जराशी चूक न्यायाधीशांच्या कोपाचे कारण ठरू शकते. सध्या अशाच प्रसंगाचा एक व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. एक वकील महाशय गुटका चघळत न्यायाधिशांपुढे उभे राहतात. यावरून न्यायाधीश महोदय त्याची चांगलीच खरडपट्टी काढताना दिसतात. हा मजेशीर व्हीडिओ बघणाऱ्यांना हसू आवरणे कठीण जात आहे.
या व्हीडिओत दोन न्यायाधीश त्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसतात. दोन वकील त्यांच्यासमोर उभे राहून एका खटल्याच्या संदर्भात त्यांच्याशी युक्तिवाद करत आहेत. दरम्यान, न्यायाधीशांना अचानक एका वकिलाचे दात दिसले, म्हणून त्यांनी ताबडतोब वकिलाला दात घासण्याचा सल्ला दिला. वकील त्याला सॉरी म्हणतो, पण न्यायाधीश इथेच थांबत नाहीत, तर तो वकिलाला विचारतो, ‘तू कोर्टात पान खातोस का?’. यावर वकील म्हणतात की, पान खात नसून गुटखा चघळत आहे. मग संतापलेल्या न्यायाधीशांनी त्याला अशा गोष्टी सांगितल्या की तो सॉरी आणि सॉरी ओरडू लागतो. “शिस्त नसल्यास कुठलंही काम सफल होत नाही, जीवनाचा स्तर खालावतो. जागा कुठलीही असो, शिस्त पाळली पाहिजे! न्यायाधीशांचे म्हणणे ऐका… कायद्याच्या भाषेत वकिलाला समजावलं आणि 5000 रुपयांचा दंडही ठोठावला!” या कॅप्शनसह हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.
प्रतिक्रियाही मजेशीर
45 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 40 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करत वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने ‘वकील साहेब आतापासून काळजी घेतील’ असा विश्वास व्यक्त केला तर दुसऱ्या युजरने अर्धा भारत या लोकांनी भगवा केल्याची भावना व्यक्त केली आहे.
https://twitter.com/s_afreen7/status/1616047672506617856?s=20&t=4PUkqikQ-owN7VQp5zW1-A
Court Advocate Gutkha Eating Judge Fine