गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद

by India Darpan
सप्टेंबर 27, 2022 | 1:16 pm
in संमिश्र वार्ता
0
suprime court

नवी दिल्ली – महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर महत्त्वाची सुनावणी सुरु झाली असून दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात येत आहे. पहिल्या सत्रात ठाकरे गटाकडून अॅड. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तीवाद केला आहे.

आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा, राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा अशा महत्वाच्या मुद्द्यांबरोबरच या सुनावणीत दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात केलेल्या दाव्याबाबत युक्तीवाद केला जात आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होत आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून, यात न्या. एम.आर. शाह, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा, न्या. कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे. खंडपीठापुढे शिवसेनेने केलेल्या याचिकेत शिंदे गटाच्या १६ आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या आमदारांना निलंबित करावे ही मागणी आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती, त्याविरोधातील याचिका आहे. याबरोबरच विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदा होते, असा दावा शिवसेनेने याचिकेत केला आहे. तर शिंदे गटाने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना निलंबित करण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. या सर्व याचिकेवर युक्तीवाद केला जात आहे.

या सर्व सुनावणीचे लाईव्ह या लिंकवर बघता येणार आहे.
http://webcast.gov.in/scindia/

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची सुविधा

Next Post

आता या योजनेवरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद

India Darpan

Next Post
eknath shinde devendra fadanvis e1657195561981

आता या योजनेवरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011