मुंबई – जगभरातील सर्व नागरिकांचे ओमिक्रॉन विषाणू संसर्गामुळे आफ्रिकेकडे लक्ष लागलेले असतानाच आता याच देशांमधून मुंबईत दाखल झालेल्यांपैकी आणखी चार प्रवाशांना कोरोना ससंर्ग झाल्याचे आढळून आले असून यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे राज्यासह देशाची विशेषतः मुंबईकरांची चिंता वाढली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात आफ्रिकन देशातून प्रवास करुन आलेल्या सहा जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी कोरोना बाधितांची संख्या आता दहावर पोहोचली आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली येथील व्यक्तींचा समावेश होता.
ओमिक्रॉनमुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक- दोन दिवसापुर्वीच हाय रिस्क ( जोखीम ) यादीतील देशातून आलेले ६ जण कोरोना संक्रमित असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. तसेच या सर्वांची ओमिक्रॉन चाचणीही करण्यात आली. त्याच्या अहवालाची आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं कालच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्याने नियमावली लागू केली होती होत्या. त्याच दिवशी परदेशातून आलेले ६ जण संक्रमित झाल्याचे आढळून आले असून त्यांच्याही ओमिक्रॉन अहवालाची प्रतिक्षा आहे. या सर्व प्रकारांमुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाची चिंता वाढली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे.
आफ्रिकेसह अन्य जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचा शोध मुंबई महापालिकेने सुरू केला असून यात पहिल्या टप्प्यामध्ये १२ नोव्हेंबरपासून आफ्रिकेतून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल झाले होते. त्यापैकी १०० जण हे मुंबईतील आहेत. त्यांचा शोध घेऊन आरटीपीसीआर चाचणी केली जाते आहे . १ डिसेंबरला सुमारे ११ आंतरराष्ट्रीय फ्लाईटस देशाच्या वेगवेगळ्या विमानतळावर आल्या. त्यात सुमारे ३५०० प्रवाशी होते. या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली करण्यात आली त्यात ६ जण संक्रमित असल्याचे उघड झाले. या सर्वांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच काल सुमारे ९ हजार नवे रुग्ण सापडलेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात २६७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यातच आता ओमिक्रॉनच्या नव्या संकटाने भिती निर्माण झाली असून सरकारने पुन्हा एकदा कोरोना संदर्भातील नियमावली केली आहे त्यानुसार धोकादायक देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता ७ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. त्या सर्वांचं आरटीपीसीआर केल्यानंतर त्यांना पुन्हा ७ दिवस परिक्षणात ठेवले जाईल.
ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा आफ्रिकेसह यूरोपियन देशात फैलाव वाढत आहे. त्यात धोकादायक देशांच्या यादीमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, मॉरिशस, न्युझीलँड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हॉंगकॉंग आदी देशांचा समावेश आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनला व्हेरीएंट ऑफ कंसर्न असे म्हटले आहे. त्यामुळे अनेक देशांनी स्वत:च्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या. आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्याही देखील विविध बैठका होता असून या बैठकीनंतर राज्यांना संबंधित सुचनांचे काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिले गेले आहेत.