विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूचे १२० हून अधिक प्रकार आढळले आहेत, परंतु त्यापैकी अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा प्रकारांचा सर्वाधिक गंभीर परिणाम दिसून आला आहे. या गंभीर प्रकारामुळे सावधान राहणे आवश्यक आहे, कारण देशभरातील १७४ जिल्ह्यांमध्ये नवीन प्राणघातक कोरोना विषाणू आढळले असून त्याचा धोका वाढू शकतो.
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या भीतीपोटी राजधानी दिल्लीसह पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ आणि गुजरातमध्ये कोरोनाचे गंभीर प्रकार आढळून आले आहेत, ज्यामुळे कोरोना संक्रमणाची गती वाढू शकते. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
वास्तविक पाहता, देशभरातील १४४ जिल्ह्यात ‘अल्फा’, ‘बीटा’, ‘गामा’ आणि डेल्टाचे अस्तित्व आढळले आहेत. कोरोनाच्या या नव्या प्रकारांमुळे पुन्हा एकदा कोरोनाचा वेगवान संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर या नवीन प्रकारच्या विषाणूची लागण लशींचे डोस घेतलेल्या लोकांनाही होत आहेत.
आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूचे शंभरहून अधिक प्रकार तथा उत्परिवर्तन ओळखले गेले आहेत, परंतु यापैकी अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा प्रकारांमध्ये सर्वाधिक भयानक व गंभीर परिणाम दिसून आला आहे. यानंतर ‘डेल्टा प्लस’ स्वरूपही वेगाने वाढत आहे. ईशान्येकडील राज्यांमधील वाढत्या कोरोनाचा आलेख पाहता पुन्हा एकदा लॉकडाउन लादण्याचा विचार केला जाऊ शकतो. या प्रांतात आतापर्यंत ७३ हून अधिक जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे, त्यापैकी ४८ जिल्हे हे ईशान्य राज्यातील आहेत.
केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, जेथे संसर्ग जास्त असेल तेथे लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत, परंतु एका आठवड्यात मृत्यूची संख्या ऑक्टोबरपासून खालच्या पातळीवर गेली आहे.
यूएनच्या आरोग्य एजन्सीने साप्ताहिक महामारीसंबंधी विज्ञान अहवालात म्हटले आहे की, युरोपियन प्रदेशातील ५३ देशांमध्ये संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये टक्के वाढ झाली आहे. दरम्यान डब्ल्यूएचओ संघटनेने म्हटले आहे की, २८ जून ते ४ जुलै दरम्यान कोरोनाची २६ लाखाहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली, ती मागील आठवड्याच्या तुलनेत थोडीशी वाढली होती तर या आठवड्यात मृत्यूची नोंद सात टक्क्यांनी घटून ५४ हजारांवर आली आहे. तसेच ऑक्टोबरनंतरची ही सर्वात कमी संख्या नोंद आहे.