मुंबई – महाराष्ट्रात डोंबिवलीत पहिला ओमायक्रॅानचा रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण २४ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका – दिल्ली – मुंबई मार्गे डोबिंवलीत आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या ३३ वर्षीय तरुणाला ही लागण झाली आहे. या तरुण रुग्ण आढळल्यामुळे दक्षता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तज्ञ डॅाक्टरांनी मात्र कोणीही भीती बाळगू नये असे सांगितले आहे. गेल्या काही दिवसापासून तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात असतांना हा रुग्ण सापडला आहे.