कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ८३ हजार १५१ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ३६ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १५१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३६ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ६२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८१२, चांदवड १ हजार ११७, सिन्नर १ हजार ७७, दिंडोरी ८२०, निफाड २ हजार ३५८, देवळा १ हजार २८८, नांदगांव ९१४, येवला ३०८, त्र्यंबकेश्वर ३८६, सुरगाणा २१३, पेठ ९३, कळवण ५८३, बागलाण १ हजार २२९, इगतपुरी ५०४, मालेगांव ग्रामीण ९१३ असे एकूण १२ हजार ६१५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार २००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ६० तर जिल्ह्याबाहेरील ३६० असे एकूण ३६ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख २२ हजार ०६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८०.९५ टक्के, नाशिक शहरात ८३.६७ टक्के, मालेगाव मध्ये ७६.२९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.४६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.५० इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ८७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार २३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २१८ व जिल्हा बाहेरील ८५ अशा एकूण २ हजार ६२० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– २ लाख २२ हजार ०६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ८३ हजार १५१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३६ हजार २३५ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.५० टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)