मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पीक कर्जाबाबत सहकार मंत्र्यांनी दिले हे निर्देश

मे 25, 2023 | 5:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
1140x570 11

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज दिले.

सहकार मंत्री श्री. सावे यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली सहकार विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष खोरगडे, नितीन गायकवाड, श्री. शिंगाडे, विशेष कार्य अधिकारी तथा अवर सचिव श्रीकृष्ण वाडेकर, साखर संचालक उत्तम इंदलकर, कक्ष अधिकारी अनिल चौधरी, राहुल शिंदे उपस्थित होते, तर साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सहकार विभागाने कार्यवाही करावी.

राज्यातील सहकार क्षेत्र, कृषी उत्पादन, पणन क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचे प्रशासन आणि सनियंत्रणासाठी हा जबाबदार असून या क्षेत्राला सक्षम करून सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. या संस्थांच्या ऑनलाइन नोंदणीवर उपनिबंधक कार्यालयाने भर द्यावा. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांना मार्गदर्शन करावे. तसेच नवीन सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी प्रमाणित पद्धत तयार करून तिचा वापर करावा, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. सावे यांनी शेतकरी कर्जमाफी योजना, अटल अर्थसाहाय्य योजना, सहकारी पाणीपुरवठा संस्था अनुदानाचा आढावा, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी भरती पॅनल, सहकारी पतसंस्था तपासणी लेखापरीक्षण व निधी वितरण, बंद, अवसायानातील साखर कारखाने, सहकार विभागाचे तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयांचे शासकीय जागेत स्थलांतर, साखर गाळप हंगाम, सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदांचा आढावा घेतानाच विभागातील पदोन्नती प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश दिले. अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

Cooperative Minister Crop Loan Farmers

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मॉरिशसच्या राजधानीत साकारला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा; या तारखेला होणार अनावरण

Next Post

अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या कारला अपघात कसा झाला? समोर आली ही महत्त्वाची माहिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
Fw3fBTOaUAES67l

अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या कारला अपघात कसा झाला? समोर आली ही महत्त्वाची माहिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011