नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडलेला लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याच्यावर अखेर राज्य सरकारनेही कारवाई केली आहे. खरे सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याची दखल घेत सहकार विभागाने आदेश काढले आहेत. त्यानुसार, खरे याचे निलंबन करण्यात आले आहे.
आदेशात म्हटले आहे की, १६ मे पासूनच त्याचे निलंबन करण्यात आले आहे. शासनाच्या परवानगीशिवाय खरे याला मुख्यालय म्हणजे नाशिक सोडता येणार नाही. तसेच, निलंबनाच्या दिवसापासून तीन महिन्याच्या कालावधीसाठी त्याला ५० टक्केच निर्वाह भत्ता देण्यात येईल. तीन महिन्यापेक्षा अधिक निलंबन राहिले तर हा निर्वाह भत्ता दिला जाणार नाही.
सहकार विभागाने काढलेले आदेश खालीलप्रमाणे
Cooperative Department Action on DDR Satish Khare