शुक्रवार, मे 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बांधकाम कामगारांना मुलीच्या लग्नासाठी मिळणार ५१ हजार रुपये; नवीन ३ योजना जाहीर

by India Darpan
फेब्रुवारी 2, 2022 | 5:53 pm
in राज्य
0
file photo

file photo


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात असून या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचे शव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे व बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रीम हात किंवा पाय बसविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले.

मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांकरीता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. आता या योजनांशिवाय नवीन तीन कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. मंडळाने माहे जुलै 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मंडळाकडे जमा होत असलेल्या उपकर निधीमधून मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्याकरीता इयत्ता पहिली पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अर्थसहाय्य, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकरीता विशेष सहाय्य, बांधकाम कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या घराकरीता अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांची प्रसूती तसेच गंभीर आजाराकरीता अर्थसहाय्य यासह एकूण 29 कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात येत आहे.

मंडळामार्फत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत राज्यात मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. ही योजना कोविड विषाणू कालावधीत फार उपयुक्त ठरल्यामुळे कामगारांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. सदर योजनेमुळे कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मध्यान्ह भोजन योजना राबविल्याबाबत कामगार व कामगार संघटनांकडून मंडळाचे अभिनंदन होत असल्याचे नमूद करून बांधकाम कामगारांकरिता नव्याने घोषित तीन योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश मंत्री श्री.मुश्रीफ यांनी मंडळाला दिले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चिंताजनक! हिंदी महासागराचे तपमान वाढतेय; मान्सूनवर होतोय विपरीत परिणाम

Next Post

नाशिक – बिटको चौकात टेलिपॅथी मोबाईल दुकानात धाडसी चोरी; लाखोचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास

Next Post
IMG 20220202 WA0175 1 e1643805546958

नाशिक - बिटको चौकात टेलिपॅथी मोबाईल दुकानात धाडसी चोरी; लाखोचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास

ताज्या बातम्या

Untitled 44

तूर खरेदीला केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत मुदतवाढ…

मे 23, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

मे 23, 2025
Untitled 42

धुळे प्रकरणात एक अधिकारी निलंबित, विश्रामगृहाच्या रुममध्ये मिळाले इतक्या नोटांचे बंडल

मे 23, 2025
जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी एसओपी ची अंमलबजावणी करावी 2 1024x534 1

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’…महसूलमंत्री यांनी दिले हे निर्देश

मे 23, 2025
stock market

जिंदालच्या अडचणी वाढल्या…शेअर्स गडगडले; एनसीएलटीकडे क्लास ॲक्शन खटला दाखल

मे 23, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कामकाजाचा ताण कमी करावा, जाणून घ्या, शुक्रवार, २३ मेचे राशिभविष्य

मे 23, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011