येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमतीच्या निषेधार्थ येवला शहर काँग्रेसतर्फे शिमग्याचे औचित्य साधत सिलेंडरला हार घालत टिमकी वाजत आदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. जनतेला महागडा सिलेंडर घेता येत नाही म्हणून सरपण सुद्धा याठिकाणी आंदोलनकर्त्यांनी आणत जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रातील भाजपा सरकारने घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून त्याची किंमत ११५० रुपये केली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी केला.