India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

माजी मुख्यमंत्री राबडी देवींच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा

India Darpan by India Darpan
March 6, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)चे पथक आज सकाळीच दाखल झाले आहे. राबडी या माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती आरोपी आहेत. टीम पोहोचली तेव्हा राबडी देवी विधान परिषदेत जाण्याच्या तयारीत होत्या.

विधानपरिषदेचे सदस्य आणि त्यांचे जवळचे बंधू सुनील कुमार सिंहही तेथे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि विधानसभा सदस्य तेजस्वी यादव यांच्यासह मंत्री आणि लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव हेही या निवासस्थानी उपस्थित आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव सिंगापूरहून किडनी प्रत्यारोपण करून गेल्या महिन्यातच भारतात परतले आहेत.

सीबीआयचे पथक आल्याची माहिती मिळताच राबडी यांच्या निवासस्थानाबाहेर राजद समर्थकांची गर्दी जमू लागली आहे. समर्थकांकडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. मोदी सरकार हे लालू-तेजस्वींना घाबरले आहे, त्यामुळे सीबीआयची टीम इथे पाठवण्यात आली आहे, अशा घोषणा ते देत आहेत.

https://twitter.com/airnewsalerts/status/1632625091891585025?s=20

Bihar EX CM Rabari Devi Residence CBI Raid


Previous Post

पहाटेपासून नाशकात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर प्रचंड मोठे संकट, द्राक्षासह सर्वच पिकांना फटका; नाशिक शहर अंधारात

Next Post

होळी रे होळी ….येवल्यात गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे सिलेंडरला हार घालून टिमकी वाजवत आंदोलन (बघा व्हिडिओ)

Next Post

होळी रे होळी ....येवल्यात गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे सिलेंडरला हार घालून टिमकी वाजवत आंदोलन (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group