नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत जोडो दरम्यान कंटेनर मधून प्रवास केल्यानंतर काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी रात्री मालावाहू ट्रक मधून प्रवास केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ते ट्रकमधील केबीनमध्ये बसून प्रवास करताना दिसत आहेत. दरम्यान काँग्रेस पक्षाने काही दिवसांपूर्वीच कर्नाटक विधानसभा निवडणूकीत मोठा विजय मिळवला आहे. राज्यात पक्षाला १३५ जागांवर विजय मिळाला असून कर्नाटकात काँग्रेसचं सरकार स्थापन झाले असून या विजयानंतर राहुल गांधी सतत चर्चेत आहेत.
अंबाला ते चंदीगड
शिमला येथे जाण्यासाठी राहुल गांधी यांनी दिल्लीतून त्यांच्या ट्रकमधील प्रवासाला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांनी अंबाला येथून चंदीगडपर्यंत त्यांनी ट्रकमधून प्रवास केला. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधी यांचे कौतुक केले. तसेच हा व्हिडीओ सोमवारी रात्रीचा असल्याचे सांगिण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी आपल्या या प्रवासादरम्यान चालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सर्वसामान्यांच्या समस्या
राहुल गांधी यांची ही अनोखी पद्धत अनेकांना भावली आहे. अनेक नागरिक हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती, आता या यात्रेचा दुसरा टप्पा निघणार का? अशी चर्चा सुरू आहे कारण त्यानंतर कर्नाटक विधानसभेत काँग्रेस पक्षाने विजय मिळवला. या विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. देशभरात वाहनचालकांची संख्या मोठी आहे. त्यातच ट्रक चालकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या समस्या, अडीअडचणी नक्की काय आहेत हे राहुल यांनी जाणून घेतले.
https://twitter.com/azizkavish/status/1660872012112490497?s=20
सगळ्यांचा आवाज ऐकायचा आहे
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर केला आहे. सुप्रिया म्हणतात की, राहुल गांधी हे विद्यापीठातले विद्यार्थी, खेळाडू, नोकरदार वर्ग, नोकरी साठी तयारी करणारे युवक, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमध्ये जाणारे सामान्य नागरिक आणि आता अर्ध्या रात्री ट्रक ड्रायव्हर्सशी संवाद का साधत आहेत, कारण त्यांना या सगळ्यांचा आवाज ऐकायचा आहे. या सगळ्या वर्गांना काय समस्या भेडसावत आहेत, हे राहुल गांधी जाणून घेत आहेत. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत, असा विश्वास राहुल गांधी यांनी प्रत्येकाला दिला आहे असेही श्रीनेत यांनी म्हटले आहे. राहुल गांधी नफरत की बाजारमें मोहब्बत की दुकान खोलने जा रहे हैं. असेही सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/SupriyaShrinate/status/1660842903319744513?s=20
Congress Leader Truck Journey Video