गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वडेट्टीवारांची कन्या शिवानी हिचे सावरकरांबद्दल मोठे विधान…. राजकीय वातावरण तापले… असं काय म्हणाल्या त्या? (बघा व्हिडिओ)

by India Darpan
एप्रिल 15, 2023 | 3:11 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Shivani Wadettiwar e1681551674563

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. बलात्कार हे राजकीय विरोधात वापरण्याचे शस्त्र आहे, असे विधान शिवानी यांनी केले आहे.

शिवानी या विजय वडेट्टीवारांच्या कन्या असून त्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले असून त्याचा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सावरकरांचे हे विचार त्यांनी स्वतःच त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात मांडले आहेत, असा दावा शिवानी यांनी वडिलांच्या मार्फत केला आहे. विधानाचा पुरावा नसेल तर मीफ मागण्याची सूचना आपण कन्येला दिली होती, पण तिने पुस्तकाचा दाखला दिल्यामुळे ती माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

सावरकरांच्या या विचारांमुळे महिलांना भीती वाटत असल्याचेही शिवानी यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांच्या सावरकर गौरव यात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवानी यांनी केलेले विधान जास्तच व्हायरल होत आहे. यात सावरकरवादी आणि सत्ताधारी दोन्हींकडून जोरदार निषेध केला जात आहे. काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही महाविकास आघाडीचा घटक आहेत. अश्यात काँग्रेस नेत्या शिवानी यांच्या विधानावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाल्या शिवानी?
‘बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी स्वतःला सुरक्षित कसे समजावे?’ असा सवाल करून अश्या लोकांची यात्रा काढली जाते हे दुर्दैव आहे, अशी टिका शिवानी वडेट्टीवार यांनी कार्यक्रमात केली. या भाषणादरम्यान शिवानी अत्यंत आक्रमक दिसत आहेत.

सावरकरांनी "सहा सोनेरी पाने" या त्यांच्या पुस्तकात बलात्कार हे राजकीय हत्यार आहे हे विकृत विधान केलेलं आहे. ज्यांना पुरावा पाहिजे त्यांनी ते पुस्तक वाचावे.

— Shivani Wadettiwar (@SVW790) April 14, 2023

तर्कहीन विधान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर्कहीन विधान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘काही लोकांना इतिहास माहिती नाही आणि वर्तमानही माहिती नाही. हे लोक विचार न करता काहीही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. एखाद्याने तर्कहीन विधान केलं तर त्यावर काय बोलणार?’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे ? pic.twitter.com/NAjdfowViC

— Shivani Wadettiwar (@SVW790) April 13, 2023

Congress Leader Shivani Wadettiwar Statement on Savarkar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमित शहा थोड्याच वेळात मुंबईमध्ये… असा आहे दौरा.. आगामी निवडणुकांसाठी बैठका… यावर होणार निर्णय…

Next Post

नाशकात ड्राय डेला दारू विक्री… चौघे गजाआड… पोलिसांनी असा केला पर्दाफाश…

India Darpan

Next Post
daru

नाशकात ड्राय डेला दारू विक्री... चौघे गजाआड... पोलिसांनी असा केला पर्दाफाश...

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011