पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे काहीसे मंदीत असलेले वाहन उद्योग क्षेत्र आता पुन्हा भरारी घेऊ लागले आहे. वाहन उद्योगासाठी 2022 हे वर्ष खूप मोठे असणार आहे. कारण या वर्षी अनेक वाहन कंपन्या नवनवीन , विशेषतः SUV मॉडेल्स बाजारात आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतातील प्रसिद्ध व प्रमुख कार उत्पादक कंपन्यामध्ये मारुती – सुझुकी, ह्युंदाई आणि महिंद्रा त्यांच्या SUV कार बाजारात आणणार आहेत. मारुतीने सध्या सेलेरियोचे CNG व्हेरियंट बाजारात आणले आहे.
मारुती सेलेरियो CNG लाँच झाली, किंमत, वैशिष्ट्ये आणि तपशील असा आहे, Celerio S-CNG ही फॅक्टरी फिट कार असून तिची किंमत 6.58 लाख रुपये आहे. Celerioचे VXi मॉडेल हे नोव्हेंबर 2021 मध्ये पेट्रोल प्रकारात लॉन्च करण्यात आले होते, त्यानंतर लॉन्चच्या केवळ 2 महिन्यांत तिला जवळपास 25,000 हजार बुकिंग मिळाले होते. Celerio च्या एकूण विक्रीने 6,00,000 युनिट्सचा टप्पा पार केला आहे.
मारुती सुझुकी SUV Vitara Brezza CNG :
मारुती सुझुकी ही आपली सध्याची लोकप्रिय SUV यावर्षी सादर करणार आहे. कंपनीच्या वतीने, नवीन Vitara Brezza 2022 SUV ला मागील मॉडेलपेक्षा नवीन डिझाइन आणि स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. मारुतीच्या नवीन ब्रेझ्झाची सीएनजी एडीशन एप्रिल 2022 पर्यंत लाँच केली जाईल. मारुती सुझुकी कंपनी ही Vitara Brezza ला एक मोठे अपडेट देणार आहे. कंपनी तिचे “विटारा” हे नाव काढणार आहे आणि तिला एसयूव्हीला मारुती सुझुकी ब्रेझा असे म्हटले जाईल. 2022 मारुती ब्रेझा सीएनजी पेट्रोल एडीशनसह ऑफर केली जाण्याची शक्यता आहे.
2022 ह्युंदाई टक्सन
दक्षिण कोरियन कार निर्माताक्रेटा, टक्सन कंपनी आणि कोना EV सह अत्यंत लोकप्रिय मॉडेल्स अपडेट करेल. सदर 2022 ह्युंदाई टक्सनही अगदी नवीन “सेन्सियस स्पोर्टिनेस” डिझाइनसह बाजारात येईल, यामध्ये ग्रिलसह डिझाइनमध्ये महत्त्वपूर्ण बदल होतील. यात ड्युअल-स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम येईल. यासोबतच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टू डिव्हाईस ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग आणि एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात येणार आहेत.
2022 महिंद्रा स्कॉर्पिओ
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ या वर्षातील सर्वात मोठ्या लाँचपैकी एक आहे. SUV शक्तिशाली इंजिन सेटअप, नवीन डिझाइन आणि फीचर अपग्रेडसह लॉन्च केली जाईल. 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ 2.0L टर्बो पेट्रोल आणि 2.2L टर्बो डिझेल मोटर्ससह बाजारात आणली जाऊ शकते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सेस असतील. नवीन स्कॉर्पिओ सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठी, रुंद आणि आकर्षक असेल.