बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सध्या मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची अशी आहे अनोखी प्रेमकहाणी

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 5:28 am
in मनोरंजन
0
Shikha Raju Shrivastav

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुरवातीला केवळ मोठ्या पडद्यावर विनोदवीर दिसायचे. मात्र आता छोट्या पडद्यावर रिऍलिटी कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन विश्वाला आणि प्रेक्षकांना अनेक विनोदी कलाकार मिळाले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे राजू श्रीवास्तव. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोमधून ते घराघरात पोहोचले. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू यांची प्रेमकहाणी मात्र, अतिशय अनोखी आहे.

विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. अशा या विनोदवीराने आपल्या मेहनत आणि कलेच्या जोरावर कलाविश्वात स्वतःच स्थान मिळवलं. तर स्वतःला सिद्ध केल्यावर त्यांनी जिच्यावर प्रेम होत तिला लग्नाची मागणी घातली. यासाठी त्यांनी तब्बल एक तप वाट पाहिली.

विनोदाचे बादशहा असलेले राजू श्रीवास्तव यांची प्रकृती काही दिवसांपासून चिंताजनक आहे. व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू यांचं खरं नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असं आहे. गजोधर आणि राजू भैया म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदांप्रमाणेच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीचा किस्सा सांगितला होता.

पत्नीचा होकार मिळवण्यासाठी त्यांना तब्बल १२ वर्ष वाट पाहावी लागली. राजू यांच्या पत्नीचं नाव शिखा श्रीवास्तव आहे. मोठ्या भावाच्या लग्नात पहिल्यांदाच दोघे एकमेकांना भेटले. शिखा यांना पाहता क्षणीच राजू भैया त्यांच्या प्रेमात पडले होते. तेव्हा त्यांनी शिखा यांच्याशीच लग्न करण्याचा निर्धार पक्का केला होता.

शिखा यांच्याबद्दल माहिती मिळवल्यानंतर त्या त्यांच्या वहिनीची चुलत बहीण असल्याचं त्यांना समजलं. तेव्हा त्या उत्तर प्रदेशातील इटावा शहरात राहत होत्या. राजू भैया यांनी सुरुवातीला शिखा यांच्या भावाशी जवळीक साधून त्यांना विश्वासात घेतलं. काही ना काही कारणाने ते शिखा यांच्या घरी जाऊ लागले. परंतु, आपल्या मनातील भावना शिखा यांना बोलून दाखवण्याचं त्यांना धाडस झालं नाही. मात्र, यासाठी स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे राजू श्रीवास्तव यांनी १९८२ साली मुंबई गाठली.

अपार मेहनत आणि कलेच्या जोरावर त्यांनी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. यामधल्या काळात चिट्ठीद्वारे ते शिखा यांच्याबरोबर संपर्कात होते. परंतु, त्यांनी कधीही त्यांच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं नाही. शिखा यांचं लग्न झालेलं नाही याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी कुटुंबियांद्वारे त्यांना लग्नाची मागणी घातली. त्यानंतर शिखा यांच्या भावाने राजू भैया यांची मालाड येथील घरी येऊन भेट घेतली.

सगळं नीट आहे याची खात्री पटल्यानंतर शिखा यांनी राजू यांच्यासह लग्न करण्यासाठी होकार दिला. १७ मे १९९३ रोजी ते विवाहबंधनात अडकले. त्यांना आयुषमान आणि अंतरा ही दोन मुले आहेत. राजू यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यांसारख्या चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप पाडली.

Comedian Raju Shrivastav Love Story Wife Shikha
Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या अभिनेत्रीने तोडले मोहाचे पाश; चक्क भगवे वस्त्र घालून धरला थेट हिमालयाचा रस्ता

Next Post

नवे शैक्षणिक धोरण नक्की कधी लागू होणार? मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले….

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

नवे शैक्षणिक धोरण नक्की कधी लागू होणार? मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले....

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011