सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या अभिनेत्रीने तोडले मोहाचे पाश; चक्क भगवे वस्त्र घालून धरला थेट हिमालयाचा रस्ता

by India Darpan
ऑगस्ट 23, 2022 | 5:24 am
in मनोरंजन
0
Fah QRlVQAEVUtW

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्व हे त्याच्या चाहत्यांसाठी नेहमी चर्चेचा विषय ठरतो. इथे कधी काय घडेल याचा नेम नाही. आम्ही सांगणार आहोत ती घटना देखील अशीच काहीशी आहे. टीव्ही अभिनेत्री आणि ‘दिया और बाती’ फेम नुपूर अलंकारने अभिनय जगतातून संन्यास घेतला आहे. तसेच तिने स्वतःला सर्व प्रकारच्या मोहजालापासून दूर केलं आहे. सध्या ही अभिनेत्री भगवे कपडे परिधान करते आहे. तर आता संन्यास घेतल्यानंतर ती हिमालयात राहत असल्याचंही समोर आले आहे.

आपला कल नेहमीच अध्यात्माकडे असल्याचे नुपूरने सांगितले होते. सध्या ती याचा अवलंब करत असून तिने स्वतःला त्यात पूर्णपणे वाहून घेतल्याचे समजते. नुपूर तिच्या वैयक्तिक आयष्यामुळे आधीही चर्चेत राहिली आहे. २०१९ मध्ये, तिची आर्थिक स्थिती खूपच खराब झाली. दैनंदिन खर्च भागवणंही कठीण झाले होते. तसेच आर्थिक अडचणींमुळे घर गहाण ठेवण्याचा विचार करत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. नुपूरने ‘दिया और बाती’, यासोबतच दूरदर्शनवरील प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’, ‘तंत्र’ आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केलंय.

नुकत्याच एका मुलाखतीत ती म्हणाली, “मी माझं आधीचं आयुष्य मिस करत नाही. माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याच प्रकारचा ड्रामा नव्हता. मी चित्रपटसृष्टीत असताना मला लोकप्रियता आणि यशाची चिंता होती. पण आता मला कशाचीच चिंता नसून माझ्या जीवनात शांतता आहे.” दरम्यान, नुपूरने पती अलंकार श्रीवास्तवशी सर्व संबंध तोडत असल्याची माहिती दिली आहे. तिच्या पतीने तिला अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी सर्व नातेसंबंधातून मोकळं केलंय, असं ती म्हणाली. परंतु दोघे अद्याप कायदेशीररित्या वेगळे झालेले नाहीत. दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतलेला नाही.

Entertainment Actress Nupur Alankar Took Sanyas

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिंदेंसह बंडखोरांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आखली ही रणनिती

Next Post

सध्या मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची अशी आहे अनोखी प्रेमकहाणी

Next Post
Shikha Raju Shrivastav

सध्या मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची अशी आहे अनोखी प्रेमकहाणी

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011