शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे – कुठे कोणते रोप लावावे?

डिसेंबर 3, 2021 | 5:00 am
in इतर
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


कुठे कोणते रोप लावावे?

वातावरण व मातीचा पोत याला अनुसरून आपण वृक्षारोपण करायला हवे. तसे केल्यास नक्कीच आपल्या या संकल्पनेला व मेहनतीला चांगले यश येईल. त्या अनुषंगाने आपण विचार करून कुठल्या भागात, कुठल्या प्रकारचे वृक्षलागवड करणे योग्य आहे, हेच आपण आज जाणून घेऊया…

shekhar gaikwad
शेखर गायकवाड
आपलं पर्यावरण संस्था
मो. 9422267801

अनेकांना वाटते की वृक्षारोपण हा एक सोपस्कार आहे. पण, ते एक शास्त्र आहे. कारण, कुठेही, केव्हाही आणि कोणतेही रोप लावले तर ते जगेलच याची शाश्वती नाही. खरे तर ते शास्त्रशुद्ध करण्याचे एक काम आहे. म्हणूच वृक्षारोपणाविषयी आपल्याला उत्तम असा अभ्यास करणे अगत्याचे आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, काही ठिकाणी उष्ण भाग आहे. कुठे डोंगर उताराला खडकाळ, मुरमाड जमीन आहे. तर कुठे मातीचा पोत चांगला आहे. अशा सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आपण वृक्षारोपणाच नियोजन करणे अपेक्षित आहे.

केवळ रोप लावून किंवा बिया टाकून फायदा नाही. त्या त्या जागेत वृक्षांची वाढ पण योग्य रितीने होईल व जैवविविधतेला पोषक असं वातावरण तयार होईल, असे वृक्षारोपण करायला हवे. तरच आपला उद्देश सफल होईल. तर चला मग आपण थोडक्यात कुठ-कुठल्या वृक्ष प्रजातींची लागवड करायची याची ओळख करून घेऊया.

मुबलक पाणी व चागंल्या मातीचा पोत असलेल्या ठिकाणी
रोहितक, मोखा, कंदब, हिरडा, बकुळ, ताम्हण, फणस, नेवर, रुद्राक्ष, कुंभा, रतनगुंज, टोकफळ, भेरली माड, हळदु, अर्जुन, नाना, अजाण, भुत्या, पाडळ, खडशिंगी, मुचकंद , कोशिम इत्यादी

उष्ण भाग व मुरमाड, डोंगराळ जमीन
हिवर, खैर, शमी, शिरीष, हिंगण बेट, चारोळी, पाचुंदा, सोनसावर, दुरंगी बाभुळ, कहांडळ, काळा कुडा, वावळ, मेडशींग, जंगली अजाण, गोंदण, पळस, काटेसावर, हटरुण, पांगारा, धामणी, निमई, खिरणी, गुग्गुळ, सलई, शिवण, निम, बहावा, बारतोंडी, शिसव, भोरमाल, कुंकू इत्यादी.

सामन्यतः सर्व ठिकाणी येणारे वृक्ष
बेल, अर्जुन, पिंपळ,वड, मोह, वारस, धावडा, शिसम, तिवस, भोकर, बिजा, वायवर्णा, आपटा, कळम व ई.
वडाचे प्रकार
वड, कृष्णवड, नानद्रृक, पारस वड, रबर वृक्ष
पिंपळाचे प्रकार
खडक पायर, पायर, आष्टा, अंबा पायर, दातिर,
उंबर चे प्रकार
गांध्या उंबर, अंजीर, जंगली अंजीर, कुडा चे प्रकार:- काळा कुडा, पांढरा कुडा, तांबडा कुडा (पांडु कुडा)
कांचनचे प्रकार
सेमला कांचन, आम्ली, पांढरा कांचन वृक्ष, पांढरा कांचन झुडुप, पिवळा कांचन, आपटा, मोठी चांबुळी, चांबुळी, कोरहळ

तर अशी आहे थोडक्यात आपली वृक्ष प्रजाती आणि त्यांच्या लागवडीचे योग्य प्रदेश. विषय खुप मोठा आहे. थोडक्यात तो सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असल्यास त्यांनी निसंकोच संपर्क साधावा. पुढच्या भागात आपण देशी आणि विदेशी वृक्ष प्रजाती याविषयी माहिती घेऊ…

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील या १७५ पोलिस निरीक्षकांना मिळाली पदोन्नती

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011