गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष – वलयांकित – प्रशांत किशोर

by India Darpan
जून 15, 2021 | 2:12 pm
in इतर
0
kishor pawar

पवारांच्या दरबारात प्रशांत किशोर

राजकारण आणि निवडणुकीतील चाणक्य अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. यानिमित्ताने प्रशांत यांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांच्या कार्याचा हा वेध..
दिलीप फडके
प्रा. दिलीप फडके
(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत)
ई मेल – pdilip_nsk@yahoo.com
सेट झालेल्या आणि आता डबल सेंच्युरी करणारच इतका कॉन्फिडन्स असल्याचे दाखवणाऱ्या एखाद्या फलंदाजाला चक्क क्लीनबोल्ड  करणाऱ्या बोलरच्या पुढच्या बॉलकडे सगळ्यांचे बारकाईने लक्ष असावे अशी काहीशी अवस्था सध्या प्रशांत किशोर यांची झाली आहे. बंगालची निवडणूक खिशात टाकून आणि पंजाबच्या कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासाठी काम करायची तयारी करतांनाच अचानक मुंबईमध्ये अवतार घेत शरद पवारांच्या सोबत भोजन घेत त्यांनी सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
जी गत क्रिकेटमधल्या  हॅटट्रिकच्या प्रतीक्षेत असणा-या बॉलरची होत असते तीच सध्या प्रशांत किशोर यांची झालेली आहे. देशातल्या निवडणुकांमध्ये जितकी चर्चा राजकारणी नेत्यांची होत असते त्यापेक्षाही जास्त चर्चा होत असते ती प्रशांत किशोर यांची. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्यासाठी लोकसभा निवडणुकीत काम केल्यावर पार्टी बदलून बिहारच्या निवडणुकीत चक्क नितीश-लालू भागीदारीला मदतीचा हात देणारे – आणि निवडणूक जिंकून देणारे प्रशांत किशोर, त्यानंतरच्या आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या ठरणा-या उत्तर प्रदेशाच्या  विधानसभा निवडणुकांमध्ये चक्क राहुल गांधींच्या बाजूला येऊन उभे राहत स्वतः सोबत कॉँग्रेसलाही दारुण पराभवाचा अनुभव देणारे प्रशांत किशोर, बंगालमध्ये जबरदस्तरित्या यशस्वी ठरले आहेत. अशा स्थितीत प्रशांत किशोर यांचा करिष्मा  महाराष्ट्रात  आणि  त्याच्या बरोबरीने  देशात काय चमत्कार दाखवणार ह्याबद्दल सर्वांना कुतूहल आहे.
जेमतेम पंचेचाळीशीच्या घरातले प्रशांत किशोर मूळचे बिहारचे. शहाबाद जिल्ह्यातले. त्यांचे वडील डॉक्टर होते. सार्वजनिक आरोग्य ह्या विषयात उच्च शिक्षण घेतल्यावर सुरुवातीला काही काळ त्यांनी बिहार आणि आंध्रप्रदेशमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात काम केले आणि नंतर   २०० ० सालच्या आसपास त्यांना युनोच्या जागतिक आरोग्य संघटनेत काम करण्याची संधी मिळाली.
तिथे ब-याच वरच्या स्तरावर काम करत असतांना साधारण २००७ च्या सुमारास ते भारतात आले होते आणि त्या प्रवासात त्यांची राहुल गांधींची भेट झाली. भारतासारख्या देशामध्ये  असणा-या विविधतेचा विचार करून अनेक स्तर आणि विविधांगी विकासाच्या कल्पनेवर त्यांनी राहुल गांधींच्या बरोबर संवाद साधण्याचा पर्यत केला पण राहुल यांना त्या कल्पनांमध्ये फारसे स्वारस्य नव्हते असा प्रशांत किशोर यांना अनुभव आला.
राहुल गांधींनी  अमेठी लोकसभा मतदार संघात एक रुग्णालय काढण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. राहुल यांच्याशी त्यावेळी त्याचे फारसे जमले नाही आणि परिणामी प्रशांत किशोर आपल्या युनोच्या कामाकडे परतले. २०१०मध्ये युनोच्या वतीने युनिसेफ चालवत असलेल्या चाडमधल्या मदत कार्यक्रमाची जबाबदारी त्यांना दिली गेली.  भारताच्या नियोजन आयोगाच्या वतीने इथल्या सार्वजनिक आरोग्याच्या स्थितीबद्दलचे एक टिपण त्यांच्या पाहण्यात आले. त्यावर त्यांनी मनमोहनसिंगांना एक पत्र पाठवले. त्याला त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणा-या मोदींनी  त्या पत्राची मोदींनी लगेच दखल घेतली आणि लगेचच प्रशांत किशोर यांची भेट घेऊन मोदींनी त्यांना आपल्या राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात  काम करणा-या सामाजिक यंत्रणेची जबाबदारी देऊन त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यास आपण उत्सुक आहोत हे दाखवून दिले.  या कामात त्यांना मोदींच्या हाताखाली थेट त्यांच्या घरातून काम करण्याची संधी मिळाली होती.

prashant kishor

एव्हाना  प्रशांत किशोर यांचा समावेश मोदींच्या निकटच्या लोकांमध्ये व्हायला लागलेला होता. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये कोणतेही अधिकृत पद त्यांच्याकडे नव्हते. २०१२ च्या गुजरातच्या निवडणुकांमध्ये किशोर यांनी मोदींसाठी काम केले खरे पण त्या विजयाचे  श्रेय त्यांच्या वाट्याला आले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुका भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली लढवणार हे नक्की झाले आणि त्यानंतर प्रशांत किशोर निवडणुकांच्या पडद्यावर ठळकपणे दिसायला लागले.  ह्या निवडणुकीत सारी दाने जणू मोदींच्याच बाजूने पडत होती. त्यांच्या भाषणांची आणि सभांची जादू सर्वसाधारण मतदारांवर होतांना दिसायला लागलेली होती.
निवडणुकीसाठी नव्यानव्या घोषणा शोधल्या गेल्या, नवी साधने वापरली गेली, नव्या क्लुप्त्या लढवण्यात आल्या. मोबाईलवरून मोदींचे ऑडिओ आणि व्हिडीओ संदेश फिरायला लागले. लोकांमध्ये त्यांचीच चर्चा व्हायला लागली. चायपे चर्चा सारखे कल्पक कार्यक्रम लोकांना  विलक्षण भावले. ह्या सर्वाच्या मागे ज्या टीमचा हात होता त्याचे कर्णधार होते प्रशांत किशोर.
२०१४ च्या आसपास किशोर यांनी सिटीझन फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स हा एक कार्यगट निर्माण केला होता. आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्थांमध्ये शिकलेल्या उच्च शिक्षित तंत्रज्ञांचा समावेश त्यात होता. आणि त्याच्या माध्यमातून किशोर यांनी अनेक नव्या गोष्टी प्रत्यक्षात राबवल्या होत्या. त्या निवडणुकीसाठी मोदींची प्रतिमा निर्माण करण्यापासून ते मणिशंकर अय्यर यांनी मोदींच्या चायवाला असण्याबद्दल टाकलेल्या नोबॉलचा चातुर्याने फायदा उठवण्यापर्यंत अनेक नव्या गोष्टी त्या निवडणुकीत घडल्या आणि मोदींनी २०१४ ची निवडणूक जिंकली.
मोदींच्या राजवटीत आपल्याला इतरांच्या पेक्षा अधिक महत्वाची भूमिका मिळेल अशी किशोर यांची अपेक्षा असावी. बहुधा ह्याच सुमारास त्यांच्या मनात कुठेतरी राजकीय महत्वाकांक्षासुद्धा  निर्माण झाली असावी. पण ते घडले नाही आणि प्रशांत किशोर मोदींपासून दुरावले. पुढे बिहारच्या निवडणुकीत आपण बिहारचे असल्याने आणि आपल्या मनात नीतिशकुमारांचे एक वेगळे स्थान असल्याचे सांगत त्यांनी नितीशकुमार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आणि यावेळी काल परवाचे सहकारी असणा-या मोदी-अमित शहा जोडीला जोराचा धक्का दिला.
इजा–बिजा झाले खरे. ह्या दोन्ही विजयांचे सगळे श्रेय किशोर यांना देता येणार नाही हे म्हणणे चुकीचे नाही. लोकसभा निवडणुकीतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आणि त्यामुळे मतदानाचे वाढलेले प्रमाण, कॉंग्रेस आणि विशेषतः राहुल गांधींच्याकडून घडलेल्या चुका, मणीशंकर, दिग्विजयसिंह यांच्यासारख्या बेतालपणाने बोलणाऱ्या नेत्यांची विधाने ह्या सगळ्यांना सुद्धा मोदींच्या विजयाचे श्रेय द्यावेच लागले. तशीच काहीशी बिहारचीही गोष्ट आहे.
स्वतः नितीशकुमारांची स्वच्छ प्रतिमा, आणि लोकांना भिडलेला त्यांचा  निवडणुक प्रचार तसेच स्वकेन्द्री राजकारण करण्याची चूक करणा-या मोदी-शहा यांचे बिहारच्या नितीशविजयातले महत्व नाकारता कसे येईल ? मुळात लालूप्रसादांचा स्वतःचा एक पक्का राजकीय बेस आहे. भाजपाच्या तथाकथित वर्चस्वाविरोधात सर्व मोदीविरोधी शक्तींची एकजूट झाली होती हेदेखील नजरेआड करता येणार नाही. ह्या दोन परिक्षांमधल्या यशानंतर उत्तरप्रदेशात मात्र प्रशांत किशोर आणखी एका आणि सर्वात कठीण परीक्षेला बसलेल्या प्रशांत किशोर यांना साफ अपयश आले.
चायपे चर्चाच्या यशाची सर कॉँग्रेसच्या खाट पे चर्चा ला आली नाही. लोक प्रशांत किशोर यांनी ठेवलेल्या खाटा घेऊन पळून गेले. एकूणच पाठीशी प्रशांत किशोरसारखे व्यूहरचनाकार असून सुद्धा त्या निवडणुकीत कॉँग्रेसची खटीया खडी करण्यात भाजपाला यश आले. आत्ता बंगालच्या निवडणुकांमध्ये मात्र परिस्थिती पूर्णपणाने उलटली . भाजपाच्या हाय प्रोफाइल प्रचाराला ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर पुरुन उरले आणि भाजपाला हरवता येते हे सिद्ध झाले.
आता उत्तर प्रदेशासह काही महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारी सुरू झाली आहे. ह्या निवडणुकांमध्ये मोदी विरोधी व्यूहरचना तयार करण्यात प्रशांत किशोर महत्वाचे ठरणार आहेत हे नक्की. त्यात त्यांना कितपत यश मिळते ते पुढच्या काळात दिसणारच आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय आहे कन्या वन समृध्दी योजना? कसा मिळेल लाभ?

Next Post

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन; धनंजय मुंडे यांचे निर्देश

India Darpan

Next Post
munde

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन; धनंजय मुंडे यांचे निर्देश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011