सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असा आहे दत्त परिक्रमेचा शुभारंभ.. पुण्यानंतर श्रीक्षेत्र औदुंबर… श्रीक्षेत्र अमरापूर…. एकदा अवश्य लाभ घ्या

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 18, 2022 | 5:03 am
in इतर
0
shree datta1

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
श्रीदत्त परिक्रमा भाग २ 
शुभारंभ दत्त परिक्रमेचा

ज्या ज्या ठिकाणी श्रीदत्त क्षेत्रे आहेत, त्या त्या ठिकाणी विलक्षण चैतन्यशक्ती वास करत असतात असा अनुभव आहे. श्रीदत्त क्षेत्रांच्या ठिकाणचे वातावरण, तिथला निसर्ग आणि परिसर श्रीदत्त अवतार आणि त्यांच्या शिष्यांच्या तपश्चर्येमुळे, वास्तव्यामुळे आणि लीलांमुळे प्रभावित झालेला आहे. तेथे प्रत्यक्ष गेल्यावर लाखो व्यक्तिंना अशा अनुभूती आलेल्या आहेत. यावर्षी श्री दत्त जयंती निमित्त “इंडिया दर्पण “च्या वाचकांना आपण प्रथमच मराठीतून श्री दत्त परिक्रमा घडवित आहोत.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

देशातील प्रत्येक श्रीदत्त क्षेत्राला भेट द्यायची भक्तांची इच्छा असते. मात्र तसा योग जमून येणे अवघड असते. संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्तमंदिर असल्याचे आढळते. मात्र तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते. या दत्त परिक्रमेची सुरुवात सर्वसाधारणपणे पुणे येथून श्रीशंकरमहाराज समाधी मंदिरापासून केली जाते .

१) श्री सद्गुरू शंकर महाराज मठ, पुणे
पुणे शहरात स्वारगेट कडून कात्रजकडे जाताना पुणे – सातारा रस्त्याच्या डाव्या बाजूस स्वारगेटपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर, पद्मावतीच्या पुढे श्री शंकर महाराज उड्डाणपूलाच्या डाव्या बाजूने पुढे आल्यावर धनकवडी येथे श्री शंकर महाराजांचा समाधी मठ (समाधीस्थान) आहे. तेथे जाण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर व कात्रज येथुन बसची सोय आहे. सुमारे एक एकर जागेत हे समाधी मंदिर आहे. उत्तर दिशेस सातारा रोडवर मठाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर डाव्या बाजूला चप्पल स्टँड तर उजवे बाजूस हात-पाय धुण्याची सोय आहे. हात व पाय धुवूनच गाभाऱ्यात जाण्याचा रिवाज आहे.

समाधी मंदिर दक्षिणोत्तर आहे. दारातून गेल्यावर प्रशस्त सभामंडप असून त्याच्या मध्यभागी मोठे यज्ञकुंड आहे. तेथे दरमहा विविध याग संपन्न होतात. समोरच दगडी बांधणीचा गाभारा आहे. गाभाऱ्यात श्रींची संगमरवरी बांधणीची भव्य समाधी व सुरेख संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. मूर्तीच्या पुढे दक्षिणोत्तर अशी महाराजांची समाधी आहे. गाभाऱ्यामध्ये महाराजांचे निरनिराळ्या पोषाखांमधील फोटो लावलेले आहेत. समाधीच्या उजव्या बाजूस श्री स्वामी समर्थांचा फोटो व पादुका आहेत तसेच देवळीत श्री गजाननाची मूर्ती आहे. तर डाव्या बाजूस सोलापूरच्या जनुकाकांचा (जनार्दनस्वामी) यांचा फोटो आहे

गाभाऱ्याचे मागील बाजूस ट्रस्टचे कार्यालय व महाराजांचे शेजघर आहे. शेजघरात महाराजांच्या काही वस्तू संग्रहित केल्या आहेत. मठात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, माणिकनगरचे श्री माणिकप्रभू, विडणीचे श्री शिवाजी महाराज, पैजारवाडीचे श्री चिले महाराज यांच्या जुन्या तसबिरी देखील आहेत. सभामंडपाच्या वरच्या मजल्यावर ध्यान मंदिर आहे. ध्यान मंदिरात श्री अक्कलकोट स्वामी व श्री शंकर महाराजांच्या भव्य तसबिरी आहेत. सामुहिक ग्रंथ पारायण तसेच मठातील इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी ध्यान मंदिराचा उपयोग होतो.
मंदिराचे बाहेर मारुती, श्री दत्तगुरु व अक्कलकोट स्वामी समर्थ यांची छोटी छोटी मंदिरे तसेच विहीर आहे.

विहिरीला बाराही महिने पाणी असते. मारुती मंदिर दक्षिणाभिमुख असून आत हनुमंताची रेखीव काळ्या पाषाणात घडविलेली मूर्ती आहे. येथुन श्री शंकर महाराजांच्या मूर्तीचे समोरून दर्शन होते. दत्त मंदिराच्या समोर वडाचा पुरातन वृक्ष आहे. त्याखाली संगमरवरी पादुका आहेत. सध्या भव्य प्रसादालय असलेल्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून तेथे अन्नदान, महाप्रसाद, दवाखाना, बालवाडी तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच महाराजांचे जीवनावर आधारित कलादालन देखील निर्माण करण्यात आले आहे. सोमवार, गुरुवार व दुर्गाष्टमीस मठात मोठी गर्दी असते.
संपर्क : श्री शंकर महाराज मठ,पुणे -सातारा रोड ,पुणे
फोन (०२०) २४३७३३०७ मोबा. ९८५०९५०४८५

२) श्रीक्षेत्र औदुंबर – नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साधना स्थळ
श्री नरसिंहसरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रोक्त आचरणाने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदायाचा सर्वत्र मोठ्याप्रमाणात प्रसार झाला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की, लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात. त्यांनी सन १४४१मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले होते, त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले.

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्रआहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली. ही कथा गुरुचरित्राच्या १७ व्या अध्यायात आलेली आहे. याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले. याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला, व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील, व त्यावृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखाली बसून गुरुचरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल, त्याभक्ताला माझा आशिर्वाद राहील; असे वचन दिले.

औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे. रेल्वेमार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे, कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते. त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते. या ठिकाणी राहण्यासाठी जोशी अगर पुजारी यांचेघरी सोय होऊ शकते .
संपर्क: श्री दत्त संस्थान, औदुंबर, तालुका पलूस, जिल्हा सांगली, महाराष्ट्र, पिनकोड- ४१६३२०.
फोन: रामभाऊ पुजारी (०२३४६) २३००५८, (मो.) ९९७०१२९७१३,
श्रीक्षेत्र औदुंबर भक्त निवास (०२३४६)२३०९३९ मोबा. ९८६०१६४०७७
श्री गिरीश जोशी (०२३४६)२३०५५४ मोबा, ९९६००४१०७०
श्री कुंटे काका मोबाईल ७९७७५८११७१
सद्गुरु स्वामी नारायणानंद तिर्थ सेवा ट्र्स्ट, औदुंबर, फोन: ०२३४६ – २३०८४८

३) श्री क्षेत्र अमरापूर – प्रति काशी, प्राचीन अमरेश्वर मंदिर
श्री क्षेत्र अमरापुर हे स्थान श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या समोर कृष्णा नदीच्या पलीकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. हे स्थान चौसष्ठ योगीनींचे निवासस्थान असलेल्या शक्ती तीर्थाजवळ आहे. श्रीगुरुची सेवा त्या अदृश्य रूपाने करीत असत. अमरेश्वरजवळच पापविनाशी तीर्थ व इतर तीर्थे आहेत. नृसिंहसरस्वती यांनी १२ वर्षे येथे वास केला. नृसिंहसरस्वतीच्या वास्तव्याने पूनीत झालेले ग्राम पुढे नृसिंहवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले.

अमरापूर हे नृसिंहवाडीपासून फक्त १ कि.मी अंतरावर आहे. श्रीगुरुंच्या काळात हे दोन्हीही एकच असावे. नृसिंहवाडीपासून अमरेश्र्वर मंदिर दिसते. श्रीगुरूचरित्रात १८ व्या अध्यायात श्रीगुरुचे पंचगंगा व कृष्णेच्या संगमस्थानी आल्याचा उल्लेख आढळतो. श्रीगुरुंची दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेल्याचा व घेवड्याच्या शेंगांचा वेल उपटून त्याचे दरिद्र हरण केल्याचा उल्लेख आहे. ही जागा अमरेश्वर मंदिराजवळच आहे.
संपर्क : श्रीक्षेत्र अमरपुर (औरवाडा) फोन (०२३२२)२७०५८६
श्री मिलिंद जमदग्नी (गुरूजी) मोबा. ७७७६९९७५९४
श्रीदत्त परिक्रमेच्या पहिल्या दिवशी आपण श्री शंकर महाराज मठ पुणे, नरसिंह सरस्वती महाराजांचे साधना स्थळ औदुंबर आणि प्रती काशी अमरापुर या स्थळांचे दर्शन घेतले. उद्या आपण नृसिंहवाडीला जाणार आहोत.

(संदर्भ सौजन्य www.dattamaharaj.com)
Column Shree Datta Parikrama Part 2 by Vijay Golesar
Religious

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – सतत हा प्रयत्न आपण करू या

Next Post

सर्वसामान्य शेतकरी देखील आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार; राज्य सरकारचा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
rice cultivation farm

सर्वसामान्य शेतकरी देखील आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकणार; राज्य सरकारचा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011