India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी – दिल्लीचा १०८ फूट उंच संकटमोचन हनुमान!

India Darpan by India Darpan
July 24, 2022
in विशेष लेख
0

 

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी
दिल्लीचा १०८ फूट उंच संकटमोचन हनुमान!

हनुमान, बजरंगबली किंवा मारुती हे संपूर्ण देशांत शक्तीचे प्रतिक मानले जाते. देशाच्या प्रत्येक भागांत हनुमानाची मंदिरं पहायला मिळतात. भारताच्या राजधानीत हनुमानाची अनेक मंदिरं आहेत. त्याचप्रमाणे जगातली दुसर्या क्रमांकाची उंच हनुमान मूर्ती नवी दिल्ली येथे आहे.

विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

दिल्लीच्या सुप्रसिद्ध करोल बागे जवळ झंडेवालान मेट्रो स्टेशन पासून ३०० मीटर अंतरावर १०८ फूट संकट मोचन धाम नावाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. पूर्वी येथे लहानशी शिव पिंड आणि छोटेखानी हनुमान मंदिर होते. या मंदिरांत ब्रह्मलीन नागाबाबा श्री सेवागिरीजी महाराज अनेक वर्षांपासून तपश्चर्या करीत होते. एकदा श्री हनुमानजी त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी या ठिकाणी मोठे हनुमान मंदिर निर्माण करण्याचा दृष्टांत दिला. बाबाजींनी ही गोष्ट आपल्या भक्तांना सांगितली. नव्वदच्या दशकातली ही गोष्ट आहे. त्यानंतर १३ मे १९९४ या दिवशी येथे हनुमान मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली विशेष म्हणजे तब्बल १३ वर्षांनी २ एप्रिल २००७ या दिवशी या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि २५ जानेवारी २००८ रोजी हनुमान मुर्तीची प्रतिष्ठापना ब्रह्मलीन नागाबाबा श्री सेवागिरी यांचे शुभहस्ते करण्यात आली. तेंव्हा पासून दरवर्षी २५ जानेवारी या दिवशी येथे मोठा भंडारा केला जातो.

दिल्लीचे १०८ फूट संकटमोचन धाम वैशिष्ट्येपूर्ण आहे. झंडेवालान मेट्रो स्टेशन जवळच असल्यामुळे मेट्रोतुन जाता येतांना हा प्रचंड हनुमान दृष्टीस पडतो. हनुमान मूर्ती १०८ फूट उंच असून येथे तीन मजले बांधण्यात आले आहेत. हनुमान मूर्तीच्या पायाशी सिंहिका नावाच्या रक्षासणीच्या वासलेल्या मुखातून मंदिरांत प्रवेश करता येतो.

हनुमानाच्या रामनाम लिहिलेल्या सुशोभित गदेजवळ मंदिराच्या तळ मजल्यावर देवीची कृत्रिम गुफा तयार करण्यात आली असून येथे माँ वैष्णो देवी आपल्या सुप्रसिद्ध तीन पिंडीसह अवतीर्ण झाली आहे. मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरवर हनुमान, शिव पार्वती, श्री गणेश, शेरावाली माता, श्रीराम फॅमिली, अखंड रामायण पीठासन आणि श्री शनि महाराज यांच्या मूर्ती आहेत. पहिल्या मजल्यावर झंडेवाली माता, दुसर्या मजल्यावर श्री सीता-राम, श्री राधा कृष्ण, पंचमुखी हनुमान आणि श्री साईं बाबा यांच्या अतिशय सुबक मूर्ती आहेत.

दर मंगळवारी आणि शनिवारी येथे हजारो भक्तांचा मेळा जमतो. यावेळी सकाळी सव्वा आठ आणि रात्री सव्वा आठ वाजता १०८ फूट उंचीचा हनुमान आपली छाती आपल्या हातांनी उघडतो आणि त्यातून श्रीराम आणि सीतामाई भाविकांना दर्शन देतात. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक जमा होतात त्यानंतर महाआरती केली जाते.

१०८ फूट संकट मोचन हनुमान मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे येथे कांगड़ा येथील ज्वाला माता मंदिरातून आणलेली अखंड ज्योत आज १६ वर्षानंतरही तेवत आहे. ज्यांच्या प्रेरणेमुळे जगातली दुसर्या क्रमांकाची उंच हनुमान मूर्ती स्थापन करण्यात आली त्या ब्रह्मलीन नागाबाबा श्री सेवागिरीजी महाराज यांनी ३० सप्टेंबर २००६ रोजी हिमाचलातील कांगड़ा येथील ज्वाला माता मंदिरातून आणलेली अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली. आजही ही ज्योत तेवत आहे. ही ज्योत पाहण्यासाठी तिचे दर्शन घेण्यासाठी भाविक उत्सुक असतात.
१०८ फूट श्री संकट मोचन धाम ट्रस्टच्या वतीने मंदिराचे व्यवस्थापन केले जाते.
दर्शन वेळ :सकाळी ६ ते रात्री १०
विशेष सण-उत्सव : हनुमान जयंती, राम नवमी, नवरात्री, महा शिवरात्री, जन्माष्टमी.

Column Rauli Mandiri Delhi 108 Feet Hanuman by vijay Golesar


Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – अमेरिकेचा नकाशा

Next Post

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; वाचा, सोमवार, २५ जुलैचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; वाचा, सोमवार, २५ जुलैचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

येवल्यातील हुडको वसाहतीत पावसाचे पाणी घुसले; घरांना तलावाचे स्वरूप.. (व्हिडिओ)

August 7, 2022

निखत जरीनचा ‘सुवर्ण’पंच! भारताची सुवर्णपदक संख्या झाली १७

August 7, 2022
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींचे ठरेल शुभ कार्य; जाणून घ्या सोमवारचे (८ ऑगस्ट) राशिभविष्य

August 7, 2022

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ८ ऑगस्ट २०२२

August 7, 2022

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पती, पत्नी रेल्वे स्टेशनवर उभे असतात

August 7, 2022

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी – लोकप्रतिनिधींच्या इच्छेतून साकारले १०४ फुटी बजरंगबली!

August 7, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group