बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – ७६ फुटी कचनार सिटी महादेव!

by Gautam Sancheti
डिसेंबर 1, 2021 | 5:06 am
in इतर
0
E5MBLO3VIAEXot7

जबलपुरचा ७६ फुटी कचनार सिटी महादेव!

एका ज्योतीने पेटविलेली दुसऱ्या दिव्याची ज्योत प्रज्वलित होते. मग दोन्ही ज्योती प्रकाशने उजळून जातात. हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु एखादी आश्चर्यचकित करणारी भव्य मूर्ती पाहून आपणही आपल्या गावात अशीच विशाल मूर्ती घडवावी, अशी एखाद्याला प्रेरणा होते. पण, प्रत्यक्षात तसे होतेच असे नाही. पण, एका व्यक्तीने प्रेरणा देणाऱ्या मूर्तीपेक्षाही मोठी मूर्ती घडविण्याचा भीमपराक्रम केला आहे. असे उदाहरण आपल्याला कदाचित ठाऊक नसेल. आज आपण याच अतिशय रंजक आणि ऐतिहासिक बाबीची माहिती घेणार आहोत.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

जबलपुर येथील कचनार सिटी शिव मंदिरांत भगवान शंकराची ७२ फूट उंच शिवमूर्ति घडविणारया अरुण कुमार तिवारी यांच्या बाबतीत हा किस्सा असाच घडलाय. भारतातील सर्वाधिक उंचीच्या भगवान शंकराच्या मूर्तीं मध्ये कचनार सिटी शिव मुर्तीचा समावेश केला जातो. मध्य प्रदेशातील जबलपुरच्या विजय नगर येथील कचनार सिटीत असलेली ही शिव मूर्ती 76 फूट उंच आहे. एवढी उंच आणि भव्य मूर्ती तयार करण्यासाठी करागिरांना अनेक वर्षे लागली. या भोलेनाथा समोर भला मोठा नंदी देखील आहे.

भगवान शंकरांच्या आकाशाला भिडणार्या अनेक मूर्ती आपण पहिल्या असतील, त्यांच्या विषयी ऐकले असेल परंतु जबलपुर येथील महादेवाची 76 फूट उंच मूर्ती पहिल्यावर माणूस थक्कं होतो. आसमंताला भिडणारी ही भव्य शिवमूर्ति पाहण्यासाठी केवळ मध्य प्रदेशातूनच नाही तर संपूर्ण देशातून भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात. महाशिवरात्रीला तर येथे लाखो भाविकांचा मेळा जमतो. या शिव मूर्तीखाली एक विशाल गुहा देखील तयार करण्यात आली आहे. या गुहेत देशातील सुप्रसिद्ध बारा जोतिर्लिंगाच्या पिंडीसारख्या हुबेहूब प्रतिमा पहायला मिळतात.

हे सर्व वर्णन वाचून ‘इंडिया दर्पण’च्या सुज्ञ वाचकांना बेंगलुरुच्या ‘शिवोहम शिव मंदिरा’ची आठवण झाली असेल तर आपण सगळे बरोबर आहात. कारण अगदी असेच आहे बेंगलुरुचे शिवोहम शिव मंदिर.एवढंच नाही तर बेंगलुरुची भव्य शिवमूर्ती पाहूनच जबलपुरची शिव मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही आहे प्रेरित झालेल्या एका शिव भक्ताच्या जिद्दीची कथा.जबलपुर येथील कचनार सिटी प्रकल्प तयार करणार्या अरुण कुमार तिवारी यांची! २००६ मध्ये त्यांनी कचनार येथील भगवान शिवाची 76 फूट उंच मूर्ती तयार केली पण त्यासाठी त्यांना किती यातायात करावी लागली ते ऐकून त्यांच्या जिद्दीचं कौतुक वाटल्या शिवाय रहात नाही.

या सर्व घटनांची सुरुवात १९९६ मध्ये झाली. जबलपुरचे एक बिल्डर अरुणकुमार तिवारी यांना जबलपुर येथे एक आगळा वेगळा गृह प्रकल्प तयार करण्याचे ठरविले. त्या साठी मुंबई, दिल्ली,कोलकत्ता सारख्या महानगरातले वैशिष्ट्यपूर्ण गृह प्रकल्प पहात पहात ते बेंगलुरुला गेले. तेथे काही आगळे वेगळे गृह प्रकल्प त्यांनी पाहिले. त्या वेळी बेंगलुरु येथे सर्वत्र शिवोहम शिव मंदिरातील ६५ फूट उंचीच्या शिव मुर्तीची चर्चा सुरु होती. सुमारे वर्ष भरापूर्वी २६ फेब्रुवारी १९९५ या दिवशी श्रुंगेरी मठाच्या शंकराचार्याच्या शुभ हस्ते या महादेव मूर्तीचे लोकार्पण झाले होते. अरुण कुमार तिवारी महादेवाची मूर्ती पहायला गेले आणि पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडले. शिवोहम शिव मंदिरातील शिवमूर्ती तर त्यांना जबलपुरला नेणे शक्य नव्हते पण अशीच किंवा याही पेक्षा मोठी शिव मूर्ती जबलपुर मध्ये निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी त्या क्षणी तेथे केला. एवढंच नाही तर हा संकल्प त्यांनी पूर्ण केला. आपले हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना खूपच कष्ट घ्यावे लागले.

या प्रसंगानंतर चार पाच वर्षांनी २००० साली अरुण तिवारींनी जबलपुर येथे कचनार सिटी गृह प्रकल्प तयार करण्याची योजना आखली. या पांच वर्षांत बेंगलुरुची शिवोहम शिव मूर्ती त्यांच्या मनात ठाण मांडूणच बसली होती. त्यामुळे कचनार सिटी गृह प्रकल्पाला हात लावण्या पूर्वीच त्यांनी शिव मूर्ती साठी ६ एकर जागा मोकळी सोडली. दोन वर्षांनी कचनार गृह प्रकल्प तयार होवून चांगलाच फार्मात आला. मग मात्र अरुण कुमार तिवारीना स्वस्थ बसवेना. २००२ साली ते बेंगलुरु येथील शिव मूर्ती घडविणार्या शिल्पकराच्या शोधार्थ निघाले.

बंगळुरु येथे पोहचल्यावर त्यांना शिवमूर्ती तयार करुन घेणारी व्यक्ती भेटली. त्यांनी मूर्तीकाराचा पत्ता विचारला त्याने प्रथम पत्ता सांगायला टाळाटाळ केली. खूप वेळा मनधरणी केल्या नंतर त्याने श्रीधर शिल्पी चे नाव सांगितले.श्रीधर शिल्पी त्यावेळी बंगलुरु पासून ३०० किमी अंतरावरअसलेल्या शिमोगा जिल्ह्यात राहत होता.श्रीधर शिल्पीला शोधायला आणखी दोन महिने लागले. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्ना नंतर अरुण कुमार तिवारी श्रीधर शिल्पी पर्यंत जावून पोहचले.

प्रथम नकार नंतर होकर!
कलाकार मंडळी मनस्वी असतात याचं प्रत्यंतर अरुण तिवारी यांना वेळोवेळी आलं.सर्व प्रथम श्रीधर शिल्पी यांनी मूर्ती तयार करायला त्यासाठी जबलपुरला यायला नकारच दिला. श्रीधर शिल्पींना उत्तरेकडे वारंवार होणार्या दंगलीची खूपच भीती वाटायची. आपण तिथे गेलो तर दंगेखोर आपल्याला ठार मारून टाकतील असं त्यांना वाटायचं. अरुण कुमार तिवारींनी तुमच्या केसांनाही धक्का लागणार नाही याची खात्री पटवून दिली तेव्हा कुठे ते जबलपुरला येण्यास तयार झाले.पण त्यातही त्यांनी अनेक अटी घातल्या.

आपल्या १५ करागिरांना घेउन मी जबलपुरला येईल. अंगावरच्या कपड्यानिशी आम्ही तेथे येऊ. काम पूर्ण होईपर्यंत आमच्या सर्वांच्या जेवण खाणे व रहाण्याची व्यवस्था तुम्ही करायची तसेच ठरलेले मानधन वेळच्या वेळी द्यायचं अशा त्यांच्या अटी होत्या.त्यांच्या सर्व अटी मान्य करुन अरुण तिवारीनी श्रीधर शिल्पी आणि सोबत १५ कामगारांना जबलपुरला आणले.

जबलपुरला आल्यावर ज्या ठिकाणी शिव मूर्ती उभारायची ती जागा त्यांना दाखवली. श्रीधर शिल्पींनी मूर्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असणार्या सर्व वस्तुंची यादी दिली. अरुण तिवारी म्हणाले, ” आम्हाला ८१ फूट उंच मूर्ती घडवून हवी आहे.” श्रीधर शिल्पी म्हणाले, ” अगदी अॅक्युरेट ८१ फूटच नाही घडविता येणार दोन तीन फूट लहान किंवा मोठी मूर्ती घडविता येईल. अशा प्रकारे सर्व सिद्धता झाल्यावर २००३ साली मूर्ती घडविण्याचे काम सुरु झाले.

मूर्ती घडवायला ३ वर्षे लागली
मूर्ती घडविण्याचं काम सुरु असतांना वर पर्यंत पोहचण्यासाठी एक लिफ्ट लावण्यात आली.ही विशेष प्रकारची हेल्पिंग लिफ्ट पुणे येथून तयार करुन आणली होती. एके दिवशी श्रीधर शिल्पी अरुणजींना लिफ्ट मध्ये बसवून वर पर्यंत घेउन गेले.लिफ्ट जेव्हा मूर्तीच्या नाका जवळ पोहचली तेव्हा अरुणजींनी विचारले, “तुम्ही मुर्तीचं नाक कसं बनविणार आहात? कारण मूर्तीच्या खुपच जवळ असल्याने आकार लक्षांत येत नव्हता. श्रीधर म्हणाले, ” तेच तर गुपित आहे पण मी आपल्याला सांगतो.” ते लिफ्टने खाली आले.दूर उभं राहून त्यांनी मूर्तीकडे नीट निरखून पहिलं आणि मग परत वर येउन मूर्तीच्या नाकाचा आकार घडवायचं काम सुरु केलं.

अशी आहे 76 फूट उंच शिवमूर्ती !
जबलपुरच्या विजय नगर येथील कचनार सिटीत असलेली व्याघ्रजिनावर ध्यानस्थ बसलेली ही शिवमूर्ती 76 फूट उंच आहे. भारतातील सर्वाधिक उंचीच्या भगवान शंकराच्या मूर्तीं मध्ये कचनार सिटी शिव मुर्तीचा समावेश केला जातो.
या ठिकाणी भगवान शिव गुहेच्या खडकांवर असलेल्या वाघाच्या कातडयावर ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांच्या डाव्या बाजुच्या मागच्या हातात त्रिशूल आणि डमरू आहे तर उजव्या बाजुच्या हातात मणिमाळ धरलेली आहे. पुढचे दोन्ही हात मांडीवर एकमेकांत गुंफलेले असून योगी महादेव अशी ही शिव प्रतिमा आहे.

या ठिकाणी भगवान शिव ध्यानस्थ बसले असून त्यांचे नेत्र अर्धोन्मीलित आहेत. शिवाच्या गळ्यात नाग आणि रुद्राक्षांच्या माळा आहेत. शिवाच्या दोन्ही दंडाना नाग बंध आहेत. शिवमूर्तीच्या मागे कृत्रिम हिमालय पर्वत तयार केला असून हिमालयात आढळणारे अशोका सारखे उंच वृक्ष वाढविलेले आहेत. संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असून अतिशय शांत आणि स्वच्छ वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या भोलेनाथा समोर भला मोठा ठसठशीत नंदी आहे.तो देखील अतिशय कलात्मक आणि आकर्षक आहे.

बारा ज्योतिर्लिंगांची उपस्थिती
बंगळुरू प्रमाणेच येथेही शिव मूर्तीच्या खाली एक गुहा तयार करण्यात आली असून तेथे देशांतील १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली आहे ही कल्पना देखील श्रीधर यांचीच! श्रीधर यांच्या सुचने वरुनच कचनार सिटी शिव मंदिराचे प्रवेशव्दार अतिशय आकर्षक बनविण्यात आले आहे. सहा एकरच्या या जागेत अन्य काही प्रतिमा तयार केलेल्या दिसतात. या सगळ्या अफलातून कलाकृती श्रीधर शिल्पी यांच्याच आहेत.

दर तीन वर्षांनी रंगरंगोटी
दर तीन वर्षांनी या मूर्तीला रंग दिला जातो. तसेच आसपासच्या परिसराची रंग रंगोटी केली जाते. स्थानिक मजूरच हे रंगकाम करतात. ही शिव मूर्ती कांक्रीट पासून तयार करण्यात आली आहे.उन्हामुळे मूर्तीला तडे जावू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते.त्यामुळे नियमित काळजी घेतली जाते. परिसरात अत्यंत आकर्षक लायटिंग करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी सगळा परिसर नयन मनोहर रंगांनी उजळून निघतो. मूर्तीच्या सौंदर्यात अधिक भर पड़ते. पाउस, थंडी आणि उन्हाचा या लायटिंग वर प्रभाव पड़त नाही.ही विशेष लायटिंग जर्मनीतून आणल्याचे अरुण तिवारी सांगतात.

सर्वांत सुंदर शिव मूर्ती
श्रीधर शिल्पी यांनी आज पर्यंत अशा प्रकारच्या १२ शिवमूर्ती घड्विल्या आहेत.पण त्या सर्वांत त्यांना कचनार शिव मूर्तीच सर्वांत जास्त आवडते. या मूर्तीच्या चेहेर्यावर असलेले ध्यानस्थ भाव इतके सफाईदार उमटलेले आहे की मूर्तीकार देखील तिच्या प्रेमांत पडलाय. पहिल्यांदा उत्तर भारतात जायला घाबरणारे श्रीधर शिल्पी दर ३-४ वर्षांनी ही मूर्ती पहायला येतात असे अरुण कुमार तिवारी कौतुकाने हसून सांगतात!

आपणांसही ही शिव मूर्ती पाहण्याची इच्छा निर्माण झाली असेल तर हा घ्या मूर्तीचा पत्ता-
कचनार सिटी महादेव, E-19, यशवंत नगर, कांचन विहार, विजय नगर, जबलपूर, मध्य प्रदेश -482002

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बघा, पाकिस्तानाचे पंतप्रधानच म्हणतात, ‘देशात कायद्याचे राज्य नाही!’

Next Post

‘जन्म अवकाशात, पृथ्वीवर फेरफटका’ असं असेल मानवाचं पुढचं आयुष्य-जेफ बेझोस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
Next Post
jeff bezos

'जन्म अवकाशात, पृथ्वीवर फेरफटका' असं असेल मानवाचं पुढचं आयुष्य-जेफ बेझोस

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011