मुंबई – पृथ्वीवरील माणसाला नेहमीच परग्रहावरील जीवसृष्टी आकर्षण राहिले आहे. तसेच चंद्रावर किंवा मंगळावर जाऊन राहावे, असे अनेकांना वाटते. परंतु ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते, असे मत जगातील श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांनी व्यक्त केले आहे.
येत्या काळात माणूस अवकाशात जन्माला येणार आहे. त्याच वेळी, पृथ्वीकडे सुट्टीचे ठिकाण म्हणून पाहिले जाईल, असा अंदाज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी व्यक्त केला आहे. जेफ बेझोस यांनी एका कार्यक्रमात भविष्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
जेफ बेझोस म्हणतात की, ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती सुट्टीसाठी वेगळ्या देशात किंवा ठिकाणी जाते, त्याचप्रमाणे अंतराळात जन्मलेली व्यक्तीही फिरायला पृथ्वीवर येईल. जेफ बेझोसची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन आहे. अलीकडेच जेफ बेझोस यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून अंतराळ प्रवास केला.
जेफ बेझोस हे बालपासूनच बुद्धीमान असून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड आहे. त्यांनी शाळेत आणि कॉलेजात असताना अनेक नवनवीन प्रयोग केले. तसेच विद्यापीठात शिक्षण घेत असताना काही तरी वेगळे करावे, अशी त्यांची संकल्पना होती. त्यातूनच त्यांनी ॲमेझॉन कंपनी स्थापन केली.
या कंपनीमार्फत त्यांनी वेगवेगळ्या वस्तू विक्री करण्यास सुरुवात केली. त्याला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला कालांतराने त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊन ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांचे विचार केवळ नव्या पिढीसाठीच नव्हे सर्वच उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत.
जेफ बेझोसच्या मते, माणसे अंतराळात जन्म घेतील, कदाचित ते त्यांचे पहिले घर असेल. ते या नवीन वसाहतींमध्ये राहतील, त्यानंतर ते पृथ्वीवर सुटीमध्ये प्रवास करतील. पृथ्वीचे हवामान आणि गुरुत्वाकर्षण तेथे निर्माण केले जाईल. कदाचित ही घरे तरंगणारी असतील आणि त्यात दहा लाख नागरिक राहू शकतील आणि त्यात नद्या, जंगले आणि वन्यजीव असतील. अंतराळात पृथ्वीवरील घरांसारखी वस्ती असेल, असेही बेझोस म्हणाले.
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांची संपत्ती जवळपास 200 अब्ज डॉलर्स आहे. जगातील ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत. तर एलोन मस्क हे जेफ बेझोस यांच्या पुढे असून मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.