गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन – …म्हणून रॉजर फेडररला कधीच विसरता येणार नाही!

by Gautam Sancheti
सप्टेंबर 17, 2022 | 9:47 pm
in इतर
0
Roger Federer

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
 पॅव्हेलिअन 
…म्हणून रॉजर फेडररला कधीच विसरता येणार नाही!

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने निवृत्ती जाहीर करुन मोठीच खळबळ माजवून दिली आहे. खरं तर तो असा काही निर्णय घेईल याची यत्किंचतही कल्पना कुणालाही नव्हती. खास म्हणजे तसा विचारही कुणी केला नाही. पण, त्याने हा बॉम्बच टेनिस विश्व आणि त्याच्या चाहत्यांवर टाकला आहे. त्याच्या यशाचाच नाही तर टेनिसमधील फेडरर पर्वाचा यानिमित्ताने आढावा घेतला तरच कळेल की रॉजर हा रॉजरच आहे. त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. याविषयी लेखन करीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…

रॉजर फेडरर बद्दल बोलतांना एकदा प्रसिद्ध माजी टेनिसपटू जिमी कॉनर्स म्हणाला होता “टेनिसमध्ये हे युग सध्या स्पेशलिस्ट खेळाडूंचे युग आहे. एक तर तुम्ही क्ले कोर्टाचे स्पेशालिस्ट असू शकता, ग्रास कोर्ट स्पेशलिस्ट असू शकता, हार्ड कोर्ट स्पेशालिस्ट असू शकता किंवा तुम्ही रॉजर फेडरर तरी असू शकता….!” वयाच्या ४१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिस मधून निवृत्ती पत्करलेल्या रॉजर फेडररच्या शैलीचे इतके यथार्थ वर्णन यापेक्षा आणखी कोणी चांगले करु शकेल, असे मला तरी वाटत नाही.

तब्बल २० ग्रँड स्लॅम स्पर्धा, १०३ एटीपी स्पर्धांचे विजेतेपद आणि हे सगळं काही जिंकत असताना पाठीचं दुखणं, गुडघ्यावरच्या शस्त्रक्रिया आणि त्याचबरोबर राफेल नदाल, नोवाक जोकोविच यांच्यासारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना शह देतांना वेळोवेळी दाखवलेली हिम्मत यासर्व पार्श्वभूमीवर राॕजरने स्वीकारलेली निवृत्ती ही धक्कादायक किंवा आश्चर्यकारक जरी वाटत असली तरी मला वाटतं की त्याच्यासह त्याच्या असंख्य असंख्य अशा चाहत्यांसाठी एक ‘वेदनादायक’ निवृत्ती आहे असे नमुद करणे जास्त योग्य ठरेल.

“मी भरपूर प्रयत्न केले. भरपूर मेहनत घेतली. परत येण्यासाठी मी पुरेसा प्रयत्न केला. परंतु, मला माझ्या शरीराच्या मर्यादा चांगल्या ठाऊक आहेत आणि म्हणूनच मी रिटायरमेंट घेत आहे” अशा चपखल आणि स्पष्ट शब्दात ट्वीट करून आपली कारकीर्द योग्य वेळी थांबवाण्याचा निर्णय राॕजरने घेतला आहे.

ग्रॕण्ड कामगिरी
रॉजरच्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली ती १९९६ ते १९९८ या कालावधीत. ज्युनिअर स्तरावरच्या भरपूर स्पर्धा तो याच काळात खेळला आणि आणि मग याच कामगिरीच्या जोरावर त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डनमध्ये २००१ साली म्हणजे त्याच्या वयाच्या १९ व्या वर्षी पहिला ‘ब्रेक थ्रू’ मिळाला. या स्पर्धेत तो विजेतेपदापासून दुर राहीला खरा पण त्याने दिग्गज पीट सॕम्प्रासचा पराभव करुन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. २००३ ला त्याने अँडी राॕडीक आणि नंतर मार्क फिलिपोसिस चा पराभव करून जेव्हा विम्बल्डनचं पहिलं विजेतेपद पटकावलं, त्यावेळेला सगळ्यांना वाटलं होतं की ग्रास कोर्ट वरचा एक नवा हिरो उदयाला आला आहे. परंतु, जगातल्या अवघ्या टेनिस तज्ञांना रॉजर फेडररने त्याची ख-या अर्थाने दखल घ्यायला लावली ती २००४ ला.

कारण त्यावर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन, यु.एस. ओपन आणि विम्बल्डन अशा हार्डकोर्ट आणि ग्रासकोर्ट या दोन्ही प्रकारच्या कोर्टवरील ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून सगळ्यांना चकीत केलं. पुढे मग २००९ ला क्ले कोर्ट वरच्या फ्रेंच ओपन चा किताब जिंकून रॉजरने “ऑल कोर्ट – ऑल राऊंड प्लेअर” अशी स्वतःची एक अफलातून ओळख तयार केली. २००३ ते २००८ या काळात तो जग जिंकायला निघालेल्या सिकंदर सारखा टेनिसचा अनभिषिक्त शहेनशाह होता. फ्रेंच ओपनचा अपवाद सोडला तर इतर तीनही ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये या काळात त्याला कोणी प्रतिस्पर्धीच उरला नव्हता. त्यानंतर राफेल नदाल, नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर या तिहेरी युद्धाचा अनुभव टेनिसच्या चाहत्यांनी आजवर घेतला आहे.

राॕजरचा फिटनेस
रॉजर टेनिसच्या कोर्टवर एक उत्कृष्ट असा अॕथेलिट मानला जात असला तरी त्याला त्याच्या शरीराने कारकीर्दीत पुरेशी साथ दिलेली नाही, हे विसरून चालणार नाही. २००६ हे रॉजरच्या कारकिर्दीतलं सगळ्यात यशस्वी वर्ष, परंतु त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी त्याला पाठीचं दुखणं जडलं आणि तिथूनच रॉजर आणि फिटनेस यांच्यातली स्पर्धा सुरू झाली. मोनोन्यूक्लियोलियस सारख्या आजाराने तो २००८ ला त्रस्त होता. अर्थात, त्याने आपल्या राजीनाम्याच्या निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे भरपूर मेहनत घेतली, पाठ दुखी आणि गुडघेदुखी सारख्या आजारावर असून कसे लांब राहता येईल यासाठी प्रयत्न केले.

या काळात पीट सॕम्प्रासचा सर्वाधिक ग्रँड स्लॅमचा विक्रम रॉजरने मोडला परंतु २०१३ ला पुन्हा एकदा त्याच्या पाठीच्या दुखण्याने डोकं वर काढलं आणि मग जागतिक रँकिंगमध्ये देखील त्याची पीछेहाट व्हायला सुरुवात झाली. २०२१ हे वर्ष ज्या पद्धतीने सगळ्या जगासाठी त्रासदायक ठरले त्याचप्रमाणे ते राॕजर साठी देखील तितकेच घातक ठरले. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून स्वतःला सावरत असताना २०२१ साली तो विम्बल्डनच्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच प्रतिस्पर्ध्यासमोर सरळ सेटमध्ये पराभूत झाला आणि मग त्याने नुकत्याच केलेल्या रिटायरमेंटच्या घोषणेचे बीज त्यावेळी रूजले गेले.

बाॕल बाॕय ते श्रीमंत खेळाडू
रॉजर फेडररने टेनिस जगताला खूप काही दिले आहे. वयाच्या आठव्या वर्षीच रॉजरला खेळांची आवड निर्माण झाली आणि हीच पुढे त्याच्यासाठी एक पॕशन बनली. वडील स्वीडीश जर्मन आणि आई आफ्रिकन त्यामुळे जन्मतःच दुहेरी नागरिकत्व लाभलेल्या रॉजरने टेनिस वरच्या आपल्या प्रेमासाठी १९९२ व १९९३ या काळात टेनिस कोर्टवर ‘बॉल बॉय’ म्हणून देखील काम केले. पुढे हाच बॉल बॉय टेनिस मधील कारकिर्दीच्या एक एक पायऱ्या चढून जाताना ‘जगातला सर्वाधिक श्रीमंत खेळाडू’ देखील ठरला याची नोंद आणि आदर्श नव्या पिढीने घेणे आवश्यक आहे.

स्वीडनमध्ये प्रत्येकाला मिलिटरी सर्व्हिस करावीच लागते. परंतु राफेल त्यासाठी ‘अपात्र’ ठरला आणि कदाचित तोच एक धागा असा होता की स्वीडनला त्यातून एक मोठा टेनिसपटू लाभला. ज्या खेळाडूची कारकीर्द ९० च्या दशकात सुरू झाली त्या खेळाडूंच्या रांगेतला रॉजर हा कदाचित आता शेवटचा खेळाडू असावा. गेल्या काही वर्षात टेनिसला जागतिक स्तरावर जी काही लोकप्रियता मिळवून देण्याचे काम काही मोजक्या खेळाडूंनी केले आहे त्यात रॉजर फेडरचा वाटा नक्कीच मोठा आहे. त्यामुळे रॉजर फेडररला असं सहज म्हणून कधीच विसरता येणार नाही.

Column Pavilion We Cant Forget Roger Federer by Jagdish Deore
Tennis

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – बाबा आणि परी

Next Post

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य (१८ ते २५ सप्टेंबर)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य (१८ ते २५ सप्टेंबर)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011