शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन – आशिया चषकाचा आज जणू अंतिम सामनाच

सप्टेंबर 4, 2022 | 10:24 am
in इतर
0
India Vs Pakistan

India Vs Pakistan


इंडिया दर्पण विशेष लेखमाला
पॅव्हेलिअन
आशिया चषकाचा आज जणू अंतिम सामनाच

अवघ्‍या आठवडाभराच्‍या अंतरात भारत आणि पाकिस्‍तान क्रिकेटचे संघ पुन्‍हा एकदा आमने-सामने येणार आहेत. दोन्‍ही देशांच्‍या क्रिकेट चाहत्‍यांसाठी ही आनंदाची पर्वणी असली, तरी खेळाडूंसाठी मात्र त्‍यांच्‍यातल्‍या गुणवत्‍तेची “कसोटी” बघणारा हा कालावधी ठरणार आहे हे निश्‍चित. यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे….

भारत आणि पाकिस्तान याच्यांमध्ये क्रिकेट सामने अतिशय कमी खेळले जातात. २८ ऑगस्‍ट २०२२ ला ज्‍या सामन्‍यात भारतीय संघाने पाकवर दिलखुलास मात केली. त्‍याआधी २८ ऑक्‍टोबर २०२१ ला दोन्‍ही संघात ट्वेन्‍टी-ट्वेन्‍टी सामना खेळला गेला आणि तो पाकिस्‍तानने जिंकला होता. थोडक्‍यात काय, तर तब्‍बल ३०८ दिवसांच्‍या अंतरानंतर या दोन्‍ही संघात हा सामना खेळला गेला होता. आता मात्र बोटावर मोजण्‍याइतक्‍या दिवसाच्‍या फरकाने पुन्‍हा एकदा उभय संघ झुंज देणार असून नेटाने लढणार आहेत.

मागच्‍या सामन्‍यात भारतीय संघाने विजय मिळवलेला असल्‍याने सहजिकच या सामन्‍यात भारताचे पारडे जड असणार यात शंका नाही. परंतु, क्रिकेटमध्‍ये प्रत्‍येक दिवस नवीन असतो आणि प्रत्‍यक्ष सामन्याच्‍या दिवशी जो नेटाने लढेल तोच संघ जिंकतो असा अनुभव आहे. त्‍यामुळे भारतीय संघ उद्याच्‍या सामन्‍यात देखील तेवढ्याच नेटाने लढून आपला विजयपथावरचा प्रवास असाच पुढे चालू ठेवणार की, पहिल्‍या पराभवाने अतोनात वेदना झालेल्‍या पाकिस्‍तान संघाकडून करडी रिअॅक्‍शन बघायला मिळणार यावर आजच्‍या सामन्‍याचे भवितव्‍य ठरणार आहे.

गेल्‍या सहा-सात दिवसात तसा फारसा काही मोठा बदल झालेला नाही. ज्‍या रविंद्र जाडेजाने मागच्‍या सामन्‍यात भारतीय संघासाठी मैदानावर महत्‍वाची भूमिका बजावली होती. त्‍या रविंद्र जाडेजाची अनुपस्थिती हा एकमेव अपवाद सोडला तर भारतीय संघाची घडी आधी होती. तेवढ्याच सुस्थितीत आज मैदानावर दिसणार आहे. कदाचित अक्षर पटेल या सामन्‍यात जाडेजाची जागा घेईल अशी चिन्‍हे आहेत आणि तसे झाल्‍यास पाकिस्‍तानसाठी त्‍याची गोलंदाजी डोकेदुखीचा विषय ठरू शकते. पटेलचे गोलंदाजीतले अक्षर समजायला पाकिस्‍तानी फलंदाजांना जड जावू शकते. जाडेजाच्‍या आणि अक्षर पटेल यांची तुलना करणे शक्‍य नसले तरी गोलंदाजीबरोबरच मधल्‍या फळीत फलंदाजीला येवून मॅच फिनीश करण्‍याची क्षमता पटेलकडे नक्‍कीच आहे.

पाकिस्‍तानच्‍या बाबतीत देखील तेच घडलंय. शाहनवाज दलाणी हा त्‍यांचा जलदगती गोलदांज दुखापतीमुळे या सामन्‍यात खेळू शकणार नाही. त्‍याची जागा हसन अली घेतो आहे. या दलानीने फलंदाजी करतांना अवघ्‍या ६ चेंडून १६ धावा ठोकल्‍या होत्‍या हे विसरून चालणार नाही. त्‍यामुळे पाकिस्‍तान संघासाठी एका मुख्‍य गोलंदाजाबरोबरच पिंच हिटरची देखील कमतरता जाणवणार आहे. याखेरीच या सात दिवसातली महत्‍वाची घटना म्‍हणजे या दोन्‍ही संघांनी दुबळ्या हॉंगकॉंग संघाचा पराभव केला आहे. भारतीय संघाने केलेला पराभव फार मोठा नव्‍हता मात्र पाकिस्‍तान संघाने एक मोठा विजय मिळवला, इतकाच काय तो फरक.

याआधी एकाच आशिया कप स्‍पर्धेत या दोन्‍ही संघांना अवघ्‍या आठवडाभराच्‍या फरकाने दोन सामने खेळण्‍याची वेळ इतिहासात दोनदा आली आहे. या दोन्‍ही स्‍पर्धा वन-डे प्रकाराच्‍या होत्‍या हे विशेष. सन २००८ ला २६ जून रोजी भारताने पहिला सामना जिंकला होता तर २ जुलैला झालेल्‍या दुस-या सामन्‍यात पाकिस्‍तानने विजय मिळविला होता. त्‍यानंतर २०१८ साली १९ सप्‍टेंबर आणि २३ सप्‍टेंबर रोजी झालेल्‍या दोन्‍ही मात्र भारतीय संघाने विजय मिळवला होता आणि यातली ठळक बाब म्‍हणजे, ही स्‍पर्धा देखील दुबईत खेळली गेली होती. २०१८ च्‍या याच कामगिरीचा रिप्‍ले भारतीय संघाकडून या सामन्‍यात बघायला मिळावा अशी भारतीय चाहत्‍यांची इच्‍छा असणार यात शंका नाही.

भारतीय संघात खेळांडूंमध्‍येच चुरस आहे. के. एल. राहूल आणि रोहित शर्मा यांच्‍याकडून मागच्‍या रविवारी झालेल्‍या सामन्‍यात समाधानकारक कामगिरी झाली नव्‍हती. दुसरीकडे विराट कोहलीने आपल्‍या बॅडपॅच वर मात करण्‍याची सुवर्णसंधी साधली होती आणि अखेरच्‍या षटकापर्यंत उभे राहून पांड्याने विजयाचे हार्दिक स्‍वागत केले होते. त्‍यानंतर हॉंगकॉंग विरूध्‍द जो सामना झाला त्‍यात सुर्यकूमार कसा तळपला होता हे पाकिस्‍तानी कर्णधाराला डोक्‍यात ठेवून डावपेच आखावे लागणार आहेत. अशा बंपर सामन्‍यात हिरो बनण्‍याची कोणतीच संधी खेळाडू सोडू इच्‍छित नाहीत. त्‍यामुळे ही संघातर्गत स्‍पर्धा, भारतीय संघासाठी विजयाची नांदी ठरेल.

पाकिस्‍तान संघाकडे सर्वात मोठे अस्‍त्र आहे आणि ते म्‍हणजे दडपण. भारतीय संघाच्‍या आघाडीच्‍या फलंदाजांवर हेच दडपण आणण्‍यात यशस्‍वी होण्‍याची या संघाची धडपड राहील. तात्‍पर्य काय तर, या सामन्‍यात भारतीय संघाचे पारडे जड असणार आहे. या विजयानंतर भारतीय संघासाठी आशिया चषकाच्‍या विजेतेपदाचा दरवाजा तर उघडणार आहेच परंतु सगळ्यात महत्‍वाची बाब म्‍हणजे या संघासाठी आगामी ट्वेन्‍टी-ट्वेन्‍टी विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी हा विजय ‘बुस्‍टर डोस’ देखील ठरणार आहे.

Column Pavilion India Pakistan Match by Jagdish Deore
Asia Cup 2022 T20 Super4 Cricket

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-३५: श्रीअरविंद-क्रांतिकारक ते महायोगी: बारिन्द्रला साधनाविषयक पत्र

Next Post

टी२० आणि ऋषभ पंतबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले….

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

crime112
क्राईम डायरी

बसस्थानक परिसरातून चोरी झालेल्या साडे तीन लाखाच्या आठ मोटारसायकली पोलिसांनी केल्या हस्तगत…

ऑक्टोबर 3, 2025
MOBILE
क्राईम डायरी

ऑनलाईन पैसे अदा केल्याचा फेक मॅसेज दाखवून पोबारा…दुकानादारांना घातला गंडा

ऑक्टोबर 3, 2025
G2P2FzVW4AAIZis 1920x1490 1
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला दिली भेट

ऑक्टोबर 3, 2025
G2QzQ01XEAAjeQw 1024x682 1
मुख्य बातमी

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

ऑक्टोबर 3, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी…

ऑक्टोबर 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी,जाणून घ्या, शुक्रवार, ३ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 3, 2025
CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
Next Post
rishabh pant

टी२० आणि ऋषभ पंतबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले....

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011