India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण विशेष – नवोदित – उद्याचा ग्रँडस्लॅम टेनिसपटू जैश्नव शिंदे

India Darpan by India Darpan
January 18, 2022
in विशेष लेख
0
इंडिया दर्पण विशेष – नवोदित – उद्याचा ग्रँडस्लॅम टेनिसपटू जैश्नव शिंदे
0
SHARES
361
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter

 

इंडिया दर्पण विशेष – नवोदित
उद्याचा ग्रँडस्लॅम टेनिसपटू जैश्नव शिंदे

नाशिक ही वेगवेगळ्या खेळाडूंची खाण आहे. विविध खेळांमध्ये अनेकांनी चमकदार  कामगिरी केली आहे. टेनिस या खेळातही अशीच भरीव कामगिरी करणारा आहे जैश्नव शिंदे. हाच जैश्नव उद्याचा ग्रँडस्लॅम टेनिसपटू म्हणून नावारुपाला येण्याची शक्यता आहे. कारण सध्या तो थेट स्पेनमध्ये दिग्गज खेळाडू राफेल नादालकडून टेनिसचे धडे घेत आहे….

दीपक ओढेकर
लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532

टेनिस या खेळात भारताला फार मोठा आणि गौरवशाली इतिहास नाही. तरीही प्राप्त परिस्थितीत भारताचे रामनाथन कृष्णन, प्रेमजित लाल, जयदीप मुखर्जी, विजय आणि आनंद अमृतराज, रमेश कृष्णन, लिएंडर पेस, महेश भूपती आणि अलीकडील देवबर्मन, युकी भांब्री हे मोजके खेळाडू जागतिक पातळीवर गाजले आणि गाजत आहेत. हा खेळ अतिशय खर्चिक आहे. तसेच दणकट शरीरयष्टी असलेल्या आणि मुख्य म्हणजे दमट हवामान नसलेल्या देशात म्हणजेच अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आदी देशातील खेळाडूंसाठी अधिक योग्य आहे. त्यामुळे भारत साहजिकच टेनिसपटूमध्ये जगाच्या तुलनेत खूप मागे आहे.

तथापि नाशिकचा एक खेळाडू जैश्नव शिंदे (वय वर्षे फक्त १६) याला टेनिसने झपाटले आहे. इतके की तो टेनिस मध्ये नुसते नाव कमाविण्यासाठी नव्हे तर चक्क सिनिअर ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याचे (म्हणजे ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन) स्वप्न बघतो आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो सरळ राफेल नादालच्या स्पेनमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला आहे.

नाशिकमधील निवेक टेनिस सेंटर येथील टेनिस प्रशिक्षक श्रीकांत कुमावत यांचा हा शिष्य. कुमावत यांच्याकडे त्याने तीन वर्षे सुरुवातीचे धडे घेतले. त्यानंतर तो पुण्यातील हेमंत बेंद्रे यांच्याकडे गेला. तेथे तीन वर्षे त्याने अॅडव्हान्स ट्रेनिंग घेतले. याकाळात तो महाराष्ट्राचा १६ वर्षांच्या गटात प्रथम क्रमांकाचा खेळाडू झाला. शिवाय त्याने भारतातील सहाव्या क्रमांकावर त्याने झेप घेतली. त्यानंतर आयटीएफ म्हणजे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या रँकिंग स्पर्धांमध्ये गुवाहाटी (उपांत्य फेरी) दिल्ली (दुहेरीत विजेता) आणि पुणे येथे एकेरी आणि दुहेरीमध्ये सहभागी असा उत्तम खेळ तो करतो आहे. खास म्हणजे सोळा वर्षांचा असूनही १९ वर्षांच्या गटात त्याची ही कामगिरी थक्क करणारी आहे. त्याची ही गुणवत्ता पाहूनच प्रशिक्षक बेंद्रे यांनी त्याला पुढील प्रशिक्षण घेण्यासाठी युरोपीय देशात जाण्याचा सल्ला दिला.

युरोपमध्ये त्याला आधुनिक आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि प्रशिक्षक मिळतील. तसेच जगातील अव्वल प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सातत्याने खेळायला मिळेल. याचा फायदा गुणांकन सुधारण्यासाठी होईल. मोठ्या स्पर्धा खेळायला मिळतील. जैश्नवने हा सल्ला मानला. म्हणूनच आपल्या आईसह ते स्पेनमध्ये पुढील प्रशिक्षण प्रख्यात पांचो अकादमीत प्रवेश घेण्यासाठी रवाना झाला. तिथे त्याची प्रगती योग्य दिशेने आणि कौतुकास्पदरित्या चालू आहे, असे समजते. सध्या तो १८ वर्षे वयाखालील (U18)च्या जागतिक रँकिंगमध्ये ८०० च्या आत आलेला आहे. त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे म्हणायला हरकत नाही.

त्याचे नाशिकचे प्रशिक्षक श्रीकांत कुमावत यांच्यामते “जैश्नव इतका एकाग्रतेने (focussed) खेळतो की तो निश्चितपणे सिनिअर ग्रँडस्लॅम खेळेल. फक्त त्याने फिटनेसकडे कायम लक्ष द्यावे. त्याचा घणाघाती फोरहँड हे त्याचे अस्त्र आहे. त्याच्या भात्यात आता इतरही अस्त्रे अॅड होतील. त्यामुळे तो एक परिपूर्ण असा खेळाडू भारताला मिळू शकतो.” प्रश्न हा आहे की, असे असंख्य होतकरू तरुण मोठ्या आशेने आणि स्वप्न घेऊन परदेशी प्रशिक्षण घ्यायला जातात. पण पुढे त्यांचे काय होते ते कळत नाही. ते विस्मृतीत जातात. जैश्नव याला अपवाद ठरावा. भारताकडून खेळणारा नाशिकमधील ते पहिला टेनिसपटू ठरो!!

Previous Post

शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक करताय? या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष…

Next Post

खुषखबर! ‘त्या’ विद्यार्थ्यांना आता विमानाचे प्रवासभाडेही मिळणार आगाऊ

Next Post
भारत आणि ब्रिटन विमानसेवा आठ जानेवारीपासून पुन्हा सुरु होणार

खुषखबर! 'त्या' विद्यार्थ्यांना आता विमानाचे प्रवासभाडेही मिळणार आगाऊ

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group