गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर – गुजरातमधील नर्मदा परिक्रमा

by India Darpan
जानेवारी 14, 2022 | 5:03 am
in इतर
0
IMG 20220113 WA0023

 

इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर
गुजरातमधील नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेबाबत आपण यात्रेची तयारी व पहिल्या सहा दिवसांचा दैनंदिन कार्यक्रम याआधीच्या भागात जाणून घेतला. आता आपण अंकलेश्वर सोडून पुढील प्रवासास सुरुवात करणार आहोत. चला तर मग भाविकांची उत्कंठा वाढवणार्‍या या यात्रेत सातव्या दिवसापासून पुढील प्रवास जाणून घेऊया…..

भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

दिवस-७
नर्मदा परिक्रमेतील आजचा प्रवास संपुर्ण यात्रेतील रोमांचकारी व अनिश्चितेते भरलेला असतो. कारण या प्रवासात सातव्या दिवशी पहाटे लवकर निघून भाविक प्रथम रस्तामार्गे कटपूर येथे पोहोचतो. कटपूर परिसरात कोटेश्वर महादेव मंदिर, श्री विमलेश्वर व रत्नेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घ्यावे. विमलेश्वर येथे मिठीतलाईसाठी बोटी मिळतात. विमलेश्वर ते मिठीतलाई हा प्रवास बोटीने करावा लागतो. मिठीतलाई येथे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. याठिकाणी नर्मदा नदी अरबी समुद्रात विलीन होते तो भाग आहे. यास रेवासागर अथवा रत्नसागर असेही म्हणतात. हा बोटीचा प्रवास मागे उल्लेख केल्यानुसार सागर किनार्‍याचे सतत बदलणारे हवामान, सागराची भरती-ओहोटी, बोटींची उपलब्धता व स्थानिक नावाड्यांच्या अडचणी अशा विविध अडथळ्यांमधून पार पाडावा लागतो. त्यामुळे सर्व सुरळीत असले तर हा प्रवास एका दिवसातही होतो, अथवा दोन-चार दिवसही लागू शकतात.

याठिकाणी बोटीने समुद्रात गेल्यानंतर नावाडी सांगतात तेथे बोटीतूनच गंगापुजन केले जाते. नर्मदा नदी सागरात विलीन झाल्यावर तिचे अस्तित्व रहात नाही. येथून नदीच्या विरुद्ध बाजूच्या काठचा प्रवास करण्यासाठी बोटीने समुद्र प्रवास करावा लागतो. नर्मदा परीक्रमेतील नियमानुसार नर्मदा नदी नेहमी आपल्या उजव्या बाजूस ठेवून प्रवास करावयाचा असल्यामुळे भाविक पलिकडे मिठीतलाई येथे उतरल्यानंतर भरुचकडे प्रयाण करतात. मिठीतलाई ते भरुच हे अंतर फक्त ४५ किमी आहे. हा प्रवास लाखीगाव, जोलवा, अटाली, हिंगलोट या प्रमुख गावांमधून होतो. मात्र भरुच हे मोठे शहर असल्याने व भरुचला राहण्याच्या सोयी चांगल्या असल्याने भाविक व ट्रॅव्हल कंपन्या हा मुक्काम भरुच येथे करतात. भरुच येथील स्वामिनारायण मंदिर अप्रतिम सुंदर आहे. येथे सायंकाळी नर्मदा आरती व भोजन असते.

दिवस-८ – भरुच ते गरुडेश्वर
भरुच ते गरुडेश्वर हे अंतर १५० कीमी आहे. हा प्रवास आपण मोटी कोरल, नारेश्वर, तिलकवाडा व कोटेश्वर मार्गे गरूडेश्वर येथे पोहचतो. नारेश्वर येथे नर्मदेकाठी टेंबेस्वामींचे शिष्य श्री.रंगअवदूत महाराज यांची समाधी व आश्रम आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रीयन भाविक येथे अवश्य भेट देतात. यानंतर कर्नाली येथे प्रसिद्ध कुबेर भंडारी दर्शन घेऊन आपण गरुडेश्वर येथे मुक्कामी पोहचतो. गरुडेश्वर येथे वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे. त्याचप्रमाणे येथील दत्त मंदिर व गरुडेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.

याचठिकाणी केवडिया येथे नर्मदा नदीतील बेटावर गुजरात सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला आहे. या परिसरास आता स्टॅच्यु ओफ युनिटी असे संबोधले जाते. हा जगातील सर्वात ऊंच पुतळा आहे.(याबाबत आपण संपुर्ण माहितीसाठी वेगळा लेख लिहू) तसेच याठिकाणी पर्यटकांसाठी इतरही अनेक आकर्षणे तयार केलेली आहेत. मात्र परिक्रमावासियांनी याचा आनंद घेतांना कुठेही नर्मदा नदी ओलांडली जाणार नाही, याची दक्षता घ्यावयाची असते. केवडिया येथे नर्मदा घाटावर दररोज सायंकाळी नर्मदा आरती असते.

दिवस- ९ – गरुडेश्वर ते महेश्वर
गरुडेश्वर ते महेश्वर हे अंतर ३०० किमी असून संपुर्ण परिक्रमेतील हा एक मोठा प्रवास आहे. याप्रवासात आपण चकतला येथून परत मध्यप्रदेशात प्रवेश करतो. यानंतर आपली परिक्रमा पूर्ण होईपर्यंत आपण मध्यप्रदेशातून प्रवास करतो.
हा प्रवासात आपण देवलिया, नसवादी , अलीराजपूर, मांडू (मांडवगड) मार्गे महेश्वर येथे पोहचतो. यातील मांडू अथवा मांडवगड हे राजा बाज बहाद्दूर व राणीरुपमती यांच्या प्रेमकथेसाठी प्रसिद्ध आहे. येथे राणी रुपमतीला नर्मदा मातेचे रोज दर्शन व्हावे यासाठी बनवलेला रुपमती पॅलेस अवश्य बघावा. तसेच येथील रेवाकुंडातही दररोज नर्मदा आरती होते.

मांडू हे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले पर्यटन स्थळ आहे. तसेच हिल स्टेशन म्हणूनही ओळखले जाते. त्याचप्रमाणे एकेकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी असलेले महेश्वर येथेही असंख्य पर्यटक भेट देतात. येथील महेश्वर राजवाड्या समोरील घाट अप्रतिमरित्या बांधलेले आहेत. महेश्वर राजवाडा परिसरात अहिल्यादेवी यांनी बांधलेले श्रीराज राजेश्वर मंदिर, श्री काशी विश्वनाथ मंदिर व अलिकडेच उभारण्यात आलेला अहिल्यादेवी यांचा पुतळा ही ठिकाणे अवश्य बघावी. तसेच महेश्वर हे माहेश्वरी साड्यांसाठीही प्रसिद्ध आहे. येथील घाटांवर नर्मदा आरती आयोजित केली जाते.

अशा प्रकारे आपली यात्रा आपण सुरु केलेल्या ओंकारेश्वर या स्थानाच्या समोरच्या काठापर्यंत पोहचली आहे. यापुढील प्रवास अगदी वेगळा व काही प्रमाणात जंगलातून आहे. मात्र याबाबत आपण पुढील भागात माहिती घेऊ.
क्रमश:

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा संक्रांतीचा दिवस; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

Next Post

१०वी, १२वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; दरमहा मिळेल २० हजार पगार

India Darpan

Next Post
job

१०वी, १२वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; दरमहा मिळेल २० हजार पगार

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011