रविवार, नोव्हेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो – फ्लॅट खरेदी केला पण पाणीच मिळत नाही?

ऑगस्ट 11, 2022 | 9:45 pm
in इतर
0
water supply

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो
फ्लॅट खरेदी केला पण पाणीच मिळत नाही?

ग्राहक मित्रांनो, आपण फ्लॅट खरेदी केला, त्याचा ताबा घेतला बिल्डरने तर २४ तास पाणी अशी जाहिरात केली होती पण प्रत्यक्ष पाणीच मिळत नाही जरी पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे तरी. आता काय करायचे? ग्राहक राजा आपणास माहित आहे का? तुम्हाला कोणते अधिकार आहेत? ग्राहक कायदा काय सांगतो? हे आपण आता जाणून घेऊया…

IMG 20220513 WA0011
विजय सागर,
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
9422502315

केंद्र शासनाचे जलशक्ती मत्रालयाने राज्य सभे मध्ये दिनांक २/०३/२०२० रोजी लेखी स्वरूपात कळवले आहे की गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने सांगितले आहे की शहरात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवशी १३५ लिटर पाणी हे बेंच मार्क म्हणून द्यावे तर खेडेगावात ते ५५ लिटर प्रत्येक व्यक्तीला दररोज द्यावे, याव्यतिरिक्त राज्य शासन हे अजून जास्त पाणी देऊ शकते.

तसेच केंद्रीय भूजल अधिकारी यांनी नॅशनल बिल्डिंग कोड २०१६ नुसार एक लाख लोकांचे वरील शहरी भागात प्रत्येक नागरिकास १५० ते २०० लिटर पाणी प्रत्येक दिवसाला लागते असे म्हणले आहे. तसेच एक बेडरूम फ्लॅट असेल तर प्रत्येक फ्लॅट मध्ये ४ जण, २ बेडरूम असतील तर ५ जण, ३ बेडरूम असतील तर ६ आणि ४ बेडरूम असतील तर ७ लोक प्रत्येक फ्लॅट मध्ये राहातात असे गृहीत धरले आहे.

तेव्हा आपल्या इमारतीमध्ये किती लोक राहतात हे आपण फ्लॅट चे साइज् नुसार काढून तितके पाणी आपणास दिले जाते का? हे तपासून पाहा.
आपल्या इमारतीचे बांधकाम करताना बिल्डर ने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, टाऊन प्लॅनिंग विभाग इथे इमारतीचे नकाशा मंजूर करून घेताना पाणी पुरवठा साठी काय आश्वासन दिले आहे का ते पहा.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्यावरून असे समजले की बिल्डर लोकांनी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, टाऊन प्लॅनिंग इथे बिनधास्त शपथ पत्र लिहून दिली आहेत की सदर बिल्डिंगला परमिशन दिली तर आम्ही महानगर पालिकेला जबाबदार धरणार नाही आणि पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आमची असेल.

ग्राहक मित्रानो नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांची प्राथमिक जबाबदारी आहे की त्यांनी नागरिकांना पाणी पुरवठा करायचा आहे. आणि तो नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. महाराष्ट्र मुनिसिपल कॉर्पोरेशन कायदा कलम ६३(२०) नुसार ही त्यांचीच जबाबदारी आहे. त्याच साठी इमारत बांधणेसाठी प्लॅन मंजूर करताना बिल्डर कडूंन डेव्हलपमेंट चार्जेस घेतले जातात. डेव्हलपमेंट चार्जेस हे रस्ता, रस्त्यावर लाईट लावणे, पाणी पुरवठा साठी पाईप लाईन टाकणे, पाणी पुरवठा साठी टाकी बांधणे, जरूर पडली तर धरणे बांधणे इत्यादी साठी सदर पैसे घेतलेले असतात. परंतु आपली जबाबदारी सदर स्वायत्त संस्था या झटकत आहेत आणि ती जबाबदारी ही बिल्डर कडे सुपूर्द करतात. वास्तविक पाण्यासाठी जल कर देखील या संस्था घेत असतात.

बिल्डर पण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी तसे शपथ पत्र लिहून देतात की पाणी द्यायची जबाबदारी बिल्डरची असेल तेव्हाच त्यांना प्लॅनला मंजुरी मिळते. वास्तविक ही ग्राहकाची शुद्ध फसवणूक आहे. ग्राहकास फ्लॅट घेताना कधीही सांगितले जात नाही वा तसे लेखी स्वरूपात लिहून दिले जात नाही की सदर ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही. ग्राहकाची फसवणूक ही अशा रीतीने सदर बिल्डर आणि या स्वायत्त संस्था एकत्रित रित्या करत आहेत. एक प्रकारे संगनमत करून ग्राहकाची फसवणूक, पिळवणूक, अडवणूक करत आहेत.

पाण्यासाठी टँकर खरेदी करून सोसायटी चे महिना देखभाल खर्च हे to हजारो, लाखो रुपये होत आहेत शिवाय टँकर द्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या शुद्धतेची हमी नाही त्यामुळे आरोग्यास धोका होतो, निरनिराळे रोग होतात, पोट बिघडते, बोरिंग पाण्यामुळे केस गळतात, पांढरे होत आहेत. क्षार युक्त पाणी अंघोळ, कपडे धुणे, भांडी घासणे साठी वापरल्याने नुकसान होत आहे.

ग्राहक मित्रानो पाण्याबाबत महारेराने निर्मल लाईफ स्टाईल, कल्याण या बिल्डरला श्री सुधीर नाईक या ग्राहकास पाणी पुरवठा सह पझेशन द्यावे असे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे २०१५ ते २०१६ या कालावधीत मुंबई हायकोर्टने कल्याण डोंबिवली महानगपालिकेला बांधकाम परमिशन साठी प्रतिबंध केला होता कारण ते पाणी पुरवठा करू शकत नव्हते. ह्या हाई कोर्ट चे ऑर्डर बाबत तसे लेखी बिल्डरने महारेराला कळवले होते तरीही सदर निकाल मध्ये महारेरा ने ग्राहकाला नुकसान भरपाई दिली.

मुबई हायकोर्टने देखील WRIT PETITION NO. 5256 OF 2021 ने दिनांक ७/०९/२०२१ रोजी निकाल दिला आहे की पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांना रोज पाणी दिले गेले पाहिजे. एवढे सगळे कायदे, निकाल असताना ही नागरिकांना पाणी मिळत नाही, तेव्हा ग्राहकाने काय करावे? आपल्या बिल्डरने प्लॅन मंजूर करून घेताना स्थानिक स्वराज्य संस्थांना काय काय लिहून दिले आहे, शपथ पत्र लिहून दिले आहे का इत्यादी माहिती काढून घेऊन (जरूर पडली तर माहिती अधिकारात माहिती मागवून घ्यावी)
त्यानंतर प्रथम सर्व लोकांनी एकत्र यावे आणि सदर बाबत नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषद यांना तसेच बिल्डरला लेखी स्वरूपात नोटीस देऊन पाण्याची मागणी करावी.

वरील सर्व कायदे, उच्च न्यायालयाचा निर्णय, महरेराचा निर्णय याचा त्यात उल्लेख करावा. त्यास १५ दिवसांची मुदत द्यावी. जर १५ दिवसात पाणी पुरवठा केला नाही तर परत एक स्मरण पत्र द्यावे आणि त्यात सात दिवसाची मुदत द्यावी. शिवाय बिल्डरला नोटीस देताना त्यांनी शपथ पत्रात लिहून दिले असेल तर पुढील पन्नास वर्षे रोज किती टँकर लागतात याचा उल्लेख करून आजच्या दिवशी प्रती टँकर किती खर्च येतो त्यात ३% इन्फ्लेशन चार्जेस प्रती वर्ष वाढवून घेऊन पुढील पन्नास वर्षांचे पाण्याचे पैसे (टँकर चार्जेस) हे नुकसान भरपाई म्हणून मागावे. शिवाय टँकर पाण्याने आरोग्यास होत असलेले परिणाम जसे केस गळणे, पांढरे होणे, पोट बिघडणे यासाठी पण नुकसान भरपाई मागावी.

त्यानंतरही जर पाणी पुरवठा झाला नाही तर बिल्डर विरूद्ध आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचे विरूद्ध ग्राहक आयोगात तक्रार दाखल करावी आणि नुकसान भरपाई मिळवावी. अखिल भारतीय ग्राहक पंचायत आपणास मोफत मार्गदर्शन करेल. ग्राहक मित्रांनो पुणे, पिंपरी चिंचवड आणि शहराजवळच्या मोठ्या भागात पण हजारो सोसायटीना पाण्यासाठी टँकर वर लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत कारण केवळ अफिडव्हेटवर बिल्डिंग परमिशन दिले गेले आहे आणि त्यामुळेच पाणी प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सदर जनहित याचिका खालील संस्थांनी एकत्र रित्या दाखल केली आहे
१)अखिल भारतीय ग्राहक पंचायत
२) वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशन,
३)पुणे जिल्हा हौसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट असोसिएशन, ४) पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन,
५) बाणेर पाषाण लिंक रोड वेल्फेअर ट्रस्ट,
६) बालेवाडी हौसिंग वेल्फेअर फेडरेशन,
७) डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन, ८) बावधन सिटिझन फोरम,
९)हिंजवडी एम्प्लॉइज आणि रेसिडेनस ट्रस्ट,
१०) औंध विकास मंडळ,
११)असोसिएशन ऑफ नगर रोड सिटिझन फोरम

तेव्हा ग्राहक मित्रानो एकत्र या संघर्ष करा आणि आपला हक्क मिळवा. ग्राहकांनी एकत्र आले तर सर्व समस्यांवर समाधान मिळू शकेल. आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005. किंवा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

अधिक माहितीसाठी
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785

श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999

*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे – 9421526777
Column Jago Grahak Jago New Flat Water Connection By Vijay sagar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – झंप्या जेव्हा समुद्रकिनारी जातो…

Next Post

या व्यक्तींना गुंतवणुकीसाठी आहे योग्य दिवस; जाणून घ्या शुक्रवार, १२ ऑगस्टचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना गुंतवणुकीसाठी आहे योग्य दिवस; जाणून घ्या शुक्रवार, १२ ऑगस्टचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011