इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जागो ग्राहक जागो
बुक केलेला फ्लॅट रद्द करायचा आहे? पैसेही परत हवेत?
प्रिय ग्राहक मित्रांनो
आपण फ्लॅट बुक केला आहे आणि आता आपला विचार बदलला आहे आणि आपणास आता सदर फ्लॅट मध्ये रस नाही तो आपणास रद्द करायचा आहे पण बिल्डर तो रद्द करून देत नाही, पैसे देत नाही मग काय करायचे?

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
9422502315
ग्राहकांनी फ्लॅट बुक करताना फारशी चौकशी न करता केवळ जाहिरात पाहून फ्लॅट बुक केला आहे. आपली आर्थिक परिस्थिती, आपली आवड, बिल्डर चे बाजारातील रेपुटेशन, इतर बिल्डर कडे त्यापेक्षा कमी दरात फ्लॅट आहेत, मेडिकल इमर्जन्सी मुळे आपणास फ्लॅट रद्द करायचा आहे, आपली नोकरी गेली आहे त्यामुळे फ्लॅट चे पुढील हफ्ते देणे शक्य नाही, नोकरी मध्ये बदली झाली आहे त्यामुळे इतरत्र परदेशात जावे लागत आहे. अशा असंख्य कारणामुळे बुक केलेला फ्लॅट आपणास घ्यायचा नाही आणि बुकिंग रद्द करायचे आहे. त्यासाठी आपण बिल्डर कडे गेलात पण बिल्डर ने मात्र बुकिंग फॉर्म मध्ये आपण सही केली आहे आणि आपण आता फ्लॅट चे बुकिंग रद्द करू शकत नाही, रद्द करायचे झाल्यास फ्लॅटचे किमतीच्या १०% रक्कम कापून घ्यावी लागेल, एकूण १ ते ५ लाख रुपये बुडतील, करार नामा रद्द करावा लागेल त्यात भरलेली स्टॅम्प ड्युटी मिळणार नाही असे आपणास बिल्डर ने किंवा बिल्डर चे एजंट ने सांगितले आहे मग आता मी काय करू अशा प्रकारचे प्रश्न ग्राहक अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्ये येऊन विचारत असतात.
ग्राहक मित्रानो प्रथम हे समजून घ्या की बिल्डर ने स्वतः केलेले नियम हे कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत सरकारचे कायद्या चे वर नसतात. तेव्हा उगीच घाबरु नका, फसू नका आणि दबावात अजिबात येऊ नका. रेरा कायदा तसेच महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप कायदा 1963 नुसार आपणास बुकिंग केलेले घर/फ्लॅट कॅन्सल करायचे असेल तर आपण ते करू शकता आणि बिल्डर आपल्यावर घर घ्याच म्हणून सक्ती करू शकत नाही. उलट आपण बिल्डर कडे दिलेल्या रकमेवर त्याच्या कडून व्याज मागू शकता. शिवाय बिल्डर आपणाकडून ठराविक रक्कम ही दंड म्हणून किंवा काहीही कारणाने कमी देणे किंवा बुकिंग फॉर्म मध्ये लिहिले आहे त्यामुळे फोरफिट केली किंवा जप्त केली असे म्हणू शकत नाही.
ग्राहक कायद्या 1986 आणि सुधारित ग्राहक कायदा 2019 नुसार देखील आपणास आपली रक्कम परत मागता येते. बिल्डर ने रक्कम देणे टाळले तर आपण त्यांना एक नोटीस ( वकिलांनी द्यायची गरज नाही, स्वतः आपण जे पत्र आणि त्यात जी मागणी करतो ती देखील नोटीस असते) द्या आणि आपले पैसे हे १२% व्याजाने परत मागा. आपण अग्रीमेंट कॅन्सल केल्या नंतर आपण शासनालाही स्टॅम्प ड्युटी परत मागू शकता. त्यासाठी आपण रजिस्ट्रार जनरल ऑफ स्टॅम्प, पुणे यांचे कडे प्रकरण दाखल करून भरलेले स्टॅम्प मागू शकता, ठराविक काळात ही रक्कम आपणास परत मिळेल फक्त त्यातील काही रक्कम शासन कापून घेते.
ग्राहक न्यायालयाने कित्येक लोकांना न्याय दिला आहे आणि भरलेले पैसे हे व्याजाने परत देणेचे आदेश दिले आहेत. आपण एक लक्षात घ्या की ऑनलाईन पर्चेस करतो तेव्हा कंपनी पण आपणास वस्तू पसंत नसेल तर ती वस्तू परत घेऊन आपले पैसे परत करते तसेच कोणतीही विमा पॉलिसी देखील फ्री लूक पिरियड म्हणजे पॉलिसी मिळाल्या पासून १५ दिवसात ती परत करू शकतो. फ्लॅट बाबत पण आपण जर तो कॅन्सल केला, तर बुकिंग चे पैसे परत मागू शकता. रेराने नुकताच एक निकाल दिला आहे आणि घर बुक केल्यानंतर कोणत्याही समस्येमुळे ते रद्द झाल्यास बिल्डर घर खरेदीदारांकडून जास्त रक्कम घेऊ शकणार नाहीत असा आदेश दिला आहे.
रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने (रेरा) (Maharashtra Rera) सर्व बांधकाम व्यावसायिकांना या संदर्भात आदेशही जारी केले आहेत.
कल्पतरू अवाना या लक्झरी रिअल इस्टेट प्रकल्पाच्या विकासकांना दिलेल्या आदेशात, रेराने (Maharashtra Rera) याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहेत. हे आदेश देताना रेराने (Maharashtra Rera) घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील करारामध्ये बुकिंग रद्द करण्याच्या बाबतीत 10 टक्के रक्कम आकारणे पूर्णपणे अवास्तव असल्याचं म्हटलं आहे. तेव्हा ग्राहक मित्रानो अजिबात घाबरु नका. आपणास कोणीही कंपलशन करू शकत नाही. शिवाय बिल्डर जरी बुकिंग फॉर्म मध्ये काहीही नमूद करत असतील तरी कायद्यात जिंतरतुद आहे तीच शेवटी ग्राह्य धरली जाते.
आपणास ग्राहक म्हणून काही समस्या असतील तर नक्की आमच्या वेबसाईट ला भेट द्या. www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. आपण ग्राहक म्हणून संघटित होणे साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मेंबर होऊन आपली पावती जपून ठेवा जी आपणास ऑनलाईन आपल्या ईमेल ने मिळेल. सभासद होणे साठी खालील लिंक वर क्लिक करा https://rzp.io/l/ABGPmembership
अधिक माहितीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005. तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यंत.
अधिक माहितीसाठी
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
ठाणे- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे 9421526777
Column Jago Grahak Jago How to Cancelled booked Flat by Vijay Sagar
Home House Real Estate Consumer Customer