इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने अखेर शतक झळकावले आहे. आपल्या ७०व्या ते ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी त्याने १०२० दिवस वाट पाहिली. ही प्रतीक्षा लांबत चालली होती, पण आज ८ सप्टेंबर २०२२ रोजी त्याने शतक झळकावले. विराटच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे ७१वे शतक झळकावले आहे.
विराट कोहलीने शेवटचे शतक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी केले होते, जेव्हा तो बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल कसोटी सामन्यात शतक झळकावण्यात यशस्वी झाला होता. त्याचवेळी विराटने आशिया चषक २०२२ च्या सुपर ४ सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ५३ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राइकरेट १८८.६८ होता, जो स्वतःच एक मोठी गोष्ट आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू आहे. त्याच्या आधी, अफगाणिस्तानविरुद्ध T20I क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या ल्यूक राइटची होती, ज्याने नाबाद ९९ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर आता विराट कोहलीने ६१ चेंडूत १२२ धावांची खेळी केली आहे. याशिवाय तो T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
https://twitter.com/maheshpupa/status/1567898557277155335?s=20&t=yW0VpfVsQZbnD6CQ6K43YA
Cricket Virat Kohli Centaury after 1020 Days India Asia Cup