सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो – फ्लॅटचा वन टाईम मेन्टेनन्स दिलाय? मग हे वाचाच…

by Gautam Sancheti
जुलै 29, 2022 | 10:23 am
in इतर
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो –
फ्लॅटचा वन टाईम मेन्टेनन्स दिलाय मग हे वाचाच…

फ्लॅट बुक करताना वन टाईम मेन्टेनन्स घेण्या-देण्याचे प्रकार सर्रास घडतात. ही रक्कम काही हजारांपासून लाखोंच्या घरात आहे. असे असले तरी यासंदर्भात एकाही ग्राहकाला हा प्रश्न पडत नाही की हा वन टाईम मेन्टेनन्स कायदेशीर आहे का. कायद्यात यासंदर्भात काही तरतूद आहे का. याविषयीच आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया…

IMG 20220513 WA0011
विजय सागर,
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
9422502315

ग्राहक राजा, बिल्डरने सोसायटीची स्थापना केली किंवा सर्व फ्लॅट धारक एकत्र येऊन बिल्डर शिवाय सोसायटीची स्थापना केली असेल परंतु वन टाईम मेंटेनन्स जो प्रत्येक फ्लॅट धारकाकडून बिल्डरने वसूल केला होता तो सोसायटीला परत केला नाही. आपण काय करायचे?

मित्रांनो, महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्ट १९६३ (मोफा) नुसार बिल्डरने सोसायटीची स्थापना ही ५१% लोकांनी फ्लॅटचे बुकिंग केल्यानंतर, ५१% लोकांनी फ्लॅटचा करारनामा केल्यानंतर चार महिन्याचे आत करायचे असते. बिल्डर हा मोफा कायदा तसेच सहकार कायदा १९६० नुसार सोसायटीची स्थापना करत नाही. हाच मुळी गुन्हा आहे. शिवाय वन टाईम मेंटेनन्स घेतो हा दुसरा गुन्हा आहे.

आपण फ्लॅट बुक करतो तेव्हा बिल्डर करारनामा करताना आपणाकडून वन टाईम मेंटेनन्स मागतो आणि अगदी गोड भाषेत सांगतो की आपण सदर रक्कम ही लोन प्रपोजल मध्ये म्हणजेच agreement मध्ये समाविष्ट करतोय त्यामुळे तुम्हाला आता खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत. ग्राहक म्हणून आपण पण कसे बेमालूम रित्या विश्वास ठेवतो आणि त्यासाठी लगेच तयार होतो किंवा बिल्डर त्या शिवाय agreement करतच नाही वगैरे वगैरे…

जेव्हा आपण फ्लॅट चा ताबा घेतो त्यानंतर पण बिल्डर हे सोसायटीची स्थापना करत नाहीत. एखादी इमारत तयार होते त्याचे पार्ट कंप्लिशन घेऊन आपणास कधी कधी ताबा दिला जातो. बिल्डरची साईट अजून चालूच असते. इतर इमारती साठी लागणारे मटेरियल, त्या सामानाची देखभाल साठी लागणारे वॉचमन, इमारत बांधकामासाठी लागणारे पाणी, वीज बिल इत्यादी खर्च बिल्डर करत असतो आणि जेव्हा दोन तीन वर्षांनी सोसायटीची स्थापन केली जाते तेव्हा बिल्डर आपले वन टाईम मेंटेनन्स हे संपले आहे उलट मलाच अजून पैसे सोसायटीचे सभासदाकडून जमा करून द्या असे सांगतो.

कित्येक इमारतीमध्ये सोसायटी स्थापन करत नाही शिवाय सार्वजनिक लाईट मीटरचे बिल भरले जात नाही तेव्हा लाईट मीटर हे वीज मंडळ काढून नेते. टँकर द्वारे पाणी पुरवठा करणे बंद केले जाते. सोसायटी स्थापन केलेली नसल्यामुळे लोकांमध्ये एकजूट नसते आणि फ्लॅट धारक लोकांचे हाल सुरू होतात. वरच्या मजल्यावर राहणारा फ्लॅट धारक लाईट मीटर नसले मुळे लिफ्ट बंद असल्यामुळे जिन्याने वर जात असतो. अक्षरशः पैसे देऊन पण लोक हवालदिल झालेले असतात. मुलांना संस्कार वर्गात टाकतात पण स्वतः एकत्र येऊन आपले प्रोब्लेम सोडवत नाहीत. एकमेका बरोबर भांडत बसतात.

वास्तविक वन टाईम मेंटेनन्स फ्लॅट परचेस करणाऱ्या ग्राहकांकडून घेणे कायद्यात नाही. आपण मोफा कायद्यात स्वतः मॉडेल agreement कसे करायचे याची माहिती करून घ्या. बिल्डर ने आपणा कडून घेतलेला वन टाईम मेंटेनन्स हा वेगळे अकाऊंट काढून त्यात ठेऊन सोसायटीला व्याजासह परत करायला हवा. तो स्वतःचे मर्जीने खर्च करून लोकांना काहीबाही हिशोब देऊन पैसे परत करत नाही अशा असंख्य तक्रारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे येत असतात. तेव्हा आपण अशा परिस्थितीत काय करू शकतो पाहा

१) बिल्डरवर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा नोंदवू शकता.
२) ग्राहक आयोगात तक्रार दाखल करू शकता
३) उप निबंधक, जिल्हा निबंधक, सहकारी संस्था यांचे कडे तक्रार करू शकता
पोलीस ग्राहकांना गुन्हा नोंदवण्यात सहकार्य करत नाहीत. अगदी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे काही फ्लॅटधारक पोलीस पण आले आहेत, पण त्यांचाही गुन्हा त्यांचे पोलीस स्टेशन मध्ये नोंदवून घेत नाहीत, हे आपले दुर्दैव आहे.

त्यावर उपाय खालिल प्रमाणे:-
१) आधी सहाय्यक पोलीस कमिशनर यांचे कडे तक्रार करा नंतर पोलीस कमिश्नर कडे तक्रार दाखल करावी
२) पोलीस प्राधिकरण कडे सदर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदारची आणि वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर यांची तक्रार करायची,
३) रजिस्टर पोस्ट ने पोलिसांना गुन्हा लिहून पाठवून द्यायचा
४) ऑनलाईन गुन्हा नोंदवावा
५) सरळ जवळच्या क्रिमिनल कोर्ट मध्ये जाऊन साध्या कागदावर दहा रुपयाचे तिकीट लावून पोलिसांना गुन्हा नोंदवणे साठी आदेश द्यायचे साठी अर्ज करायचा.

पोलिसांकडे जायचे म्हणजे ग्राहक घाबरतात जणू काही त्यांनी गुन्हाच केला आहे. आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करावे असे त्यांना वाटते. ग्राहक मित्रानो आपण सर्व एक झालो ना तर नक्की सगळी विघ्ने दूर होतील. तेव्हा सरळ वरील प्रमाणे तक्रार करा. गप्प बसू नका. अन्याय सहन करणारा पण अन्याय करणाऱ्या प्रमाणे त्यास जबाबदार आहे. आपणास संपूर्ण मोफत मार्गदर्शन करणे साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते सदैव आपल्या बरोबर राहतील. फक्त तुम्ही एकत्र या मित्रांनो.

याबाबत आणखी माहिती हवी असल्यास आपण अवश्य संपर्क करावा. आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. विजय सागर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०.

विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909

श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999

*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- शशी कांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे 9421526777

Column Jago Grahak Jago Flat One Time Maintenance is Legal or not by Vijay Sagar Consumer Right MOFA Builder

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मेडिक्लेमधारकांसाठी गुडन्यूज! आता कॅशलेस उपचार होणार सोपे

Next Post

गिरीश महाजन यांनी घेतली अमित शहांची भेट; काय झाली चर्चा? मंत्रिमंडळ विस्तार की अन्य काही?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Next Post
FYxOzmmaIAAPmwt

गिरीश महाजन यांनी घेतली अमित शहांची भेट; काय झाली चर्चा? मंत्रिमंडळ विस्तार की अन्य काही?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011