मंगळवार, डिसेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून – दुसरा तेंडुलकर की पहिला सर्फराज खान?

जून 14, 2022 | 11:17 am
in इतर
0
sarfaraz khan

 

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – खेळाच्या मैदानातून
दुसरा तेंडुलकर की पहिला सर्फराज खान?

भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळावे म्हणून धडपड करणारे भरपूर खेळाडू आहेत पण “माझ्या नशीबात असेल तर माझी भारतीय संघात निवड झाल्याशिवाय राहणार नाही. निवड होण्यासाठी मी इतर कोणतेही खास प्रयत्न करीत नाही. फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतो” असे म्हणणारा एकमेव खेळाडू म्हणजे मुंबईकडून गेली दोन वर्षे धावांची अक्षरशः रास ओतणारा उजव्या हाताने फलंदाजी करणारा सर्फराज खान हा मधल्या फळीतील फलंदाज.

Deepak odhekar
दीपक ओढेकर
लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532

मागील मोसमात ( १९ /२० ) मध्ये त्याने १५४:५६ च्या जबरदस्त सरासरीने ९२८ धावा केल्या त्यात उत्तर प्रदेश वि ३०१, हिमाचल वि २२६, सौराष्ट्र वि ७८ आणि २५ आणि मध्य प्रदेश वि १७७ धावांचा पाऊस पाडला. हा धडाका पाहून क्रिकेट शौकीन चकीत झाले पण त्यांना असे वाटले की, एखादा खेळाडू एखाद्या मोसमात खेळून जातो. त्याची फार दखल घ्यायची गरज नाही!

तथापि याही रणजी मोसमात (२१/२२ ) सर्फराजचा धमाका तसाच चालू आहे हे पाहिल्यावर मात्र हा दुसरा तेंडुलकर तर नाही असे लोक म्हणू लागले आहेत. सर्फराजच्या चालू क्रिकेट रणजी मोसमातील धावा (एकूण आतापर्यंत धावा ७०४) बघा; सौराष्ट्र वि २७५ वि गोवा ६३ आणि ४८, वि ओरिसा १६५ आणि उत्तराखंड वि नाबाद १५३. आजपासून ( मंगळवार १४ जून) रणजी उपान्त्य फेरीचे सामने सुरु होत आहेत आणि मुंबई ची गाठ उत्तर प्रदेश विरूध्द आहे . आता हा काय करतो इकडे सगळ्याचे डोळे लागले आहेत.

त्याला ताबडतोब भारतीय संघात घ्यावे असे वेंगसरकर आणि संजय मांजरेकर तसेच शास्त्री सह अनेक खेळाडूचे मत आहे . खरं तर त्याचे वय २४ आहे आणि शरीर स्थूल आणि थुलथुलीत आहे. म्हणजे कसोटी क्रिकेटपटू आजच्या अति- फिटनेसच्या जमान्यात कसा नसावा हेच वाटेल. पण एकदा तो मैदानावर उतरला आणि त्याची शैलीदार आणि धुँवाधार फलंदाजी पाहिली की प्रेक्षक बाकी सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि फक्त त्याच्या तुफानी, धडाकेबाज फलंदाजीवर फिदा होऊन जातो. सर्फराज आतापर्यंत फक्त १० रणजी सामने खेळला आहे आणि त्यात एक त्रिशतक, दोन द्विशतके आणि तीन शतके आहेत तीही १५०+.

त्याचे वडीलच ( नौशाद खान) त्याचे प्रशिक्षक आहेत. ते त्याला दिवसात तीन वेळा २-२ तास नेट प्रक्टीस करायला लावतात आणि जवळजवळ ६००-७०० चेंडू त्याला खेळायला लावतात असे सर्फराज सांगतो. २०१५ पासून म्हणजे अंडर 19 पासून तो मुम्बईत खेळतो आहे पण तीव्र स्पर्धेत मुम्बई संघात खेळायला मिळणे अवघड आहे हे लक्षात आल्यावर तो दोन मोसम उत्तर प्रदेश कडून खेळला पण त्याचे तिकडे त्याचे मन रमले नाही आणि म्हणून मनासारखा खेळही होत नाही हे पाहून तो परत मुबंईत परतला . दरम्यान कोविडमुळे एक मोसम वाया गेला त्यामुळे वय आणि शरीर वाढले तथापि प्रचंड गुणवत्ता असल्याने काहीच फरक पडला नाही .

त्याचे रन- मशिन पुन्हा दणक्यात सुरु झाले आहे. तो आता बचाव आणि आक्रमण या दोन्हीतही तरबेज झाल्याने फक्त मर्यादित षटकांचे सामनेच नव्हे तर कसोटीतही भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत आहे. अपेक्षेपेक्षाही लवकरच भारतीय संघात त्याने पदार्पण केल्यास आश्चर्य वाटू नये.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिओचा ग्राहकांना तगडा झटका! रिचार्ज प्लॅनच्या दरात तब्बल इतके टक्क्यांनी वाढ

Next Post

राष्ट्रपती निवडणूकः भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे का? अन्य पक्षांची मनधरणी का सुरू आहे?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
राष्ट्रपती भवनाचे संग्रहित छायाचित्र

राष्ट्रपती निवडणूकः भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे का? अन्य पक्षांची मनधरणी का सुरू आहे?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011