बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्हाधिकारी यांची देवळा व सटाणा येथील कोविड रुग्णालयांना भेट

by India Darpan
मे 5, 2021 | 4:38 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210505 WA0013

नाशिक – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येवून कोणताही बाधित रूग्ण उपचारापासून वंचित राहू यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने सर्व विभागांच्या समन्वयाने ग्रामीण भागात रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन यांचा आवश्यक प्रमाणात सुरळीत पुरवठा होण्यासाठी मदत होत आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

आज जिल्हा सामान्य रूग्णालय, नाशिक, देवळा व सटाणा तालुक्यांना भेट देवून तेथील कोरोना सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देवळा व सटाणा तालुका येथे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, चांदवडचे उपविभागीय अधिकारी सी. एस. देशमुख, सटाणा उपविभागीय अधिकारी विजयकुमार भांगरे, तहसिलदार दत्तात्रय शेजुळ, जितेंद्र इंगळे, जिल्हा सामान्य रूग्णालय नाशिक येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, कोरोना नोडल अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ.  निलेश जेजुरकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्हि. डि. पाटील, सटाणा मुख्याधिकारी हेमलता ढगळे,  सटाणा गट विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सटाणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भेटी दरम्यान पाहणी करतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, सामान्य रूग्णालयातील २० केएल ऑक्सिजन टँकमार्फत ऑक्सिजनचा योग्य पद्धतीने व सुरळीत पुरवठा होण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यात शासकीय कोविड रूग्णालयातील व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन काँन्सट्रेटर आणि नियोजित केलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होतील असे पहावे. त्याचप्रमाणे सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी 150 खाटांची व्यवस्था करण्यासाठी नियोजन करण्यात येवून त्याबाबत इमारत दुरूस्ती विषयक आवश्यक कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत करावी. जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिटचे काम पूर्ण झाले असून त्याचा प्रस्ताव संचालक आरोग्य सेवा यांचे कडे गेला आहे त्याचा पाठपुरावा करावा व तोपर्यंत किमान ज्या अत्यावश्यक बाबी आहेत त्यांची पूर्तता स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून आगामी दोन दिवसात करून घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. आगामी दोन दिवसात जिल्हा रुग्णालयामध्ये फायर मॉक ड्रिल ठेवण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिल्या.

जिल्हा सामान्य रुग्णलयाच्या पाहणी नंतर जिल्हाधिकारी यांनी देवळा व सटाणा तालुक्यांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले की, सर्व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स (डी.सी.एच.सी.) व दवाखान्यांचे ऑक्सिजन ऑडीट करण्यात येवून रुग्णास केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा विहीत प्रमाणात करण्यात यावा. त्याचप्रमाणे आवश्यकता असणाऱ्या रुग्णांनाच योग्यती काळजी घेवून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर होत असल्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरा यांनी खात्री करावी. तसेच ऑक्सिजनचा आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर योग्यरितीने होतो किंवा कसे यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहेत.

यावेळी तालुक्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या माहितीचा आढावा घेवून आरोग्य विभाग आणि इतर शासकीय विभागातील ज्या कर्मचाऱ्यांचा लसीकरणाचा दुसरा डोस घेणे बाकी असेल अशा कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिल्या आहेत.

याबैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी देवळा ग्रामीण रुग्णालय व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला (डी.सी.एच.सी.) भेट देवून तेथील रुग्णांसोबत संवाद साधला. दोन्ही तालुक्यातील दोन दोन खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकारी यांनी भेट दिली व तेथील रेमडेसिविर वापराबाबत व ऑक्सिजनच्या वापराबाबत पडताळणी केली. सटाणा तालुक्यातील एका खाजगी दवाखान्यातील रेमडेसिविर चे वापराबाबत तफावत आढळून आल्यामुळे या रुग्णालयाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड – एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिले विद्यार्थ्यांच्या पालकांना प्लाझ्मा दान 

Next Post

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली, चंद्रकांत पाटील यांची टीका

India Darpan

Next Post
chandrakant patil

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली, चंद्रकांत पाटील यांची टीका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011