मंगळवार, ऑगस्ट 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मला मिळालेले तीन हजार तीन लाखासारखे…नाशिक जिल्ह्यातील लाभार्थीं महिलांबरोबर मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

by Gautam Sancheti
ऑगस्ट 15, 2024 | 9:14 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20240815 WA0758 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत. या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.

कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

‍मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने 108 योजना सुरु केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज या योजनेच्या माध्यमातून बहिणींसोबत एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. सर्वसामान्य, दुर्बल, गरीब, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक – युवती, कामगार यांच्यासाठी सरकार शक्य ते सर्व करत आहे. या सर्वांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला की केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेदच्या माध्यमातून बचतगट सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. पुर्वी बचत गटांसाठी असलेली कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आता त्यामध्ये 50 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, शैक्षणिक फीसाठी त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी मुलींना शिक्षणामध्ये 100 टक्के फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, युवक – युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे. याचा फायदा उद्योगांनाही होणार आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात आहेत. त्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी फायद्यातच आली आहे. याशिवाय वारकऱ्यांना शासन मदत करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. फक्त रस्ते, पुल बांधणे, दळण वळण उभारणे महत्वाचे नाही तर लोककल्याणकारी योजना राबवणेही महत्वाचे आहे. यासाठी शासन कटीबद्ध असून राज्यातील प्रत्येक घटकासाठी शासन योजना राबवत आहे.

शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बील माफ करण्यात आले आहे. 45 लाख कृषी पंप धारकांना याचा लाभ झाला आहे. तसेच नमो सन्मान योजनेमध्ये केंद्राच्या 6 हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासनाचे 6 हजार रुपये आणखी भर घालून आता 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.

एखादी योजना सुरु करणे सोपे काम नाही. तसेच ती एका दिवसातही तयार होत नाही. लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम 1 वर्षापासून सुरु होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, सचिव यांच्या परिश्रमामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यापर्यंत योजना पोहचवल्याबद्दल सर्व अधिकारी वर्गाचे मी अभिनंदन करतो.महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनवणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींशीही संवाद
दरम्यान या संवाद सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रातिनिधिक लाभार्थींशीही संवाद साधला. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांच्यासह दोन्ही योजनांच्या लाभार्थी उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती खैरनार, ज्योती महाजन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या लाभार्थी तेजस्विनी कुलथे यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती सुनील खैरनार (रा. नांदगाव, ता. नांदगाव) यांनी १७ जुलै रोजी योजनेचा अर्ज स्वत: भरला होता. महिनाभराच्या आतच त्यांच्या बँक खात्यावर काल दुपारी रुपये तीन हजार रक्कम झाल्याचे जमा सांगून आपल्याला ही रक्षाबंधनची ओवाळणी मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या घरी पती, सासू, सासरे व २ छोटी अपत्ये आहेत. त्यांचे पती कापड दुकानात काम करतात. सहा जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांच्या पगारात भागविताना तारेवरची कसरत व्हायची. कुटुंबाला हातभार म्हणून त्या स्वत: अस्मिता ग्राम संघाच्या सदस्या झाल्या असून, बाजरी प्री मिक्स करण्याचे काम त्या करतात. या पैशांतून संसारासाठी आर्थिक मदत होणार असल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती अरुण महाजन (रा. गिरणानगर, ता. नांदगाव) यांनी बँक खात्यावर ३ दिवसांपूर्वी रक्कम जमा झाल्याचे सांगून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. कुटुंबात त्यांच्यासह पती, सासू व दहावी पास मुलगा हे सदस्य आहेत. त्यांचे पती खासगी वाहनचालक आहेत. त्या स्वतः उम्मेद अभियानच्या सी आर पी आहेत. त्यांनी १५ जुलै रोजी स्वत: या योजनेचा अर्ज भरला होता. स्वतः अर्ज भरण्याबरोबरच त्यांनी इतर महिलांनाही प्रेरित केले. त्यांचा मुलगा आय. टी. आय. ला प्रवेश घेत असून त्याच्या प्रवेशासाठी या रकमेचा विनियोग करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

या दोन्ही लाभार्थींनी मुख्यमंत्रीरूपी भाऊ आपल्या पाठिशी असल्याबद्दल आनंद व्यक्त करून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. तेजस्विनी नंदकुमार कुलथे (रा. नाशिक) ही पदवीधर युवती नोकरीच्या शोधात असताना अनुभवाअभावी तिचे प्रयत्न अपुरे पडत होते. मात्र, तिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. तिने नोंदणी केल्यानंतर तिला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी तिला मासिक दहा हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे. यामुळे तिला आर्थिक मदतीसह शासकीय कार्यालयातील कामकाजाचा अनुभव मिळणार असून, भविष्यातील नोकरीसाठी या अनुभवाची मदत होणार असल्याचे सांगून तिने राज्य शासनाचे आभार मानले.
00000

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक…स्वातंत्र्यदिनी ओझरला चार महिन्यांनी खुन्नस काढत थेट बोटच छाटले….

Next Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

WhatsApp 1
मुख्य बातमी

आपलं सरकार पोर्टलमधील १००१ सेवांचा लाभ घरबसल्या व्हॅाटसअ‍ॅपवर मिळणार…

ऑगस्ट 26, 2025
ed
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत ११७ कोटीच्या फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत हिरे, सोने व कार केली जप्त

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250130 WA0334 4
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेत ६ वरिष्ठ सहायक झाले कनिष्ठ प्रशासन अधिकारी….२५ आरोग्य सेविकांची पदोन्नती

ऑगस्ट 26, 2025
rpf
स्थानिक बातम्या

नगरसुल येथे RPF चे स्वतंत्र पोलिस स्टेशन…दोन पोलीस अधिका-यांसह २४ जणांची नियुक्ती

ऑगस्ट 26, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, मंगळवार, २६ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0362 e1756133644221
संमिश्र वार्ता

नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओची अचानक भेट…चार कर्मचारी अनधिकृत गैरहजर, कारणे दाखवा नोटीस

ऑगस्ट 25, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने ऑपरेशन चक्र अंतर्गत ट्रान्सनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेटच्या प्रमुखाला केली अटक

ऑगस्ट 25, 2025
गणपती e1756131291560
संमिश्र वार्ता

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना…

ऑगस्ट 25, 2025
Next Post
IMG 20240815 WA0796

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011