मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर कथितपणे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल. शिवाजी महाराजांच्या भूमीत अशा घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. या घोषणांचा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी पोलिस प्रशासनाने अशा घोषणाबाजीचा इन्कार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपसा संस्था (एनआयए)ने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. याच्या निषेधार्थ पीएफआयने अनेक ठिकाणी निदर्शने केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये शुक्रवारी पुण्यात पीएफआयने आयोजित केलेल्या निषेधादरम्यान कथितपणे “पाकिस्तान झिंदाबाद” च्या घोषणा दिल्या. त्यावर भाजप आणि महाराष्ट्र सरकारची तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट केले की, “पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रवृत्तीचा पुण्यात निषेध करणे योग्य नाही. पोलिस यंत्रणा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल. शिवरायांच्या मातीवर अशा घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत.”, असे ते म्हणाले.
भाजप नेतेही आक्रमक
या प्रकरणाने जोर धरला असताना दुसरीकडे भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. पुण्यात कथितपणे पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, त्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. राणे यांनी ट्विट केले की, “ज्यांनी पुण्यात पीएफआयच्या समर्थनार्थ पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.. चुन चुन के मरेंगे.. खूप काही लक्षात ठेवा!!!”
विशेष म्हणजे निदर्शनादरम्यान पोलिसांनी सुमारे ४० आंदोलकांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त सागर पाटील म्हणाले की, “बेकायदेशीरपणे एकत्र जमल्याबद्दल आम्ही पीएफआय सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि घोषणाबाजीच्या प्रकरणाचा आम्ही शोध घेत आहोत,”.
https://twitter.com/mieknathshinde/status/1573627273097273344?s=20&t=2AwPl4SB4YN9gdpD476Vhg
CM Eknath Shinde on Pakistan Zindabad Slogans