नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा गाव परिसरात बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला ही भेट चांगलीच महागात पडली. मुलांना पळविणारा असे समजून स्थानिक नागरिकांनी या तरुणाला चांगला चोप दिला. प्रेयसीच्या घरच्यांना संशय येऊ नये म्हणून प्रियकराने हा बुरखा घातला होता. पण, या प्रियकराच्या हालचाली संशयास्पद आढळल्यामुळे त्याला स्थानिकांकडून फटक्यांचा प्रसाद मिळाला. जमाव मारत असतांना पोलिसांची गाडी येथे आल्यामुळे हा तरुण बचावला. पण, त्याची प्रेयसीला भेटण्याची युक्ती सर्वां समोर आली. गेल्या काही दिवसापासून मुलांना पळविणारी टोळी फिरत असल्यामुळे नागरिक संशयास्पद दिसणा-याला चोप देत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडत आहे. त्यामुळे वडाळा गावात या प्रियकराला ही भेट चांगलीच अंगलट आली.