नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन उद्यापासून येथे सुरू होत आहे. या अधिवेशनात सत्ताधारी सरकारला खिंडीत गाठण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. यासाठी विरोधकांनी सरकारच्या चहापानावरही बहिष्कार घातला. त्यानंतर विरोध पक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच, विधिमंडळ अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत शिंदे-फडणवीस यांनी विरोधकांनाच जबाबदार धरले आहे.
बघा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची संपूर्ण पत्रकार परिषद
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1604458508283707392?s=20&t=qk4Dev3ovf6x6hkTQrFoZQ
CM Eknath Shinde DYCM Devendra Fadanvis Press Conference