नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दिपालीनगर या भागातील सतत होणारा वाहतुकीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची वारंवार मागणी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीवर मात करण्यासाठी इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्याची लांबी वाढविण्यात यावी यासाठीचा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने काही महिन्यांपूर्वी केंद्राकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाच्या मंजुरीची घोषणा आज रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यामुळे आता इंदिरानगर आणि राणेनगर येथील दोनही बोगद्यांची लांबी प्रत्येकी पंधरा मीटरने वाढणार असल्याने एक- एक बोगदा चाळीस मिटर लांबीचा होणार असून रॅम्पही होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
राणेनगर आणि इंदिरानगर हे दोन्ही बोगदे नाशिक मुंबई महामार्गावर आहेत.सिडको आणि शहर यांना जोडणारे हे दोनही बोगदे आहेत.बोगद्याचा वरील बाजूस महामार्ग असून बोगदयांना समांतरही महामार्ग आणि दोन्ही बाजूस सव्हिसरोड आहेत.शहराच्या मुख्य दोन उपनगरांना जोडणारे हे बोगदे असल्याने सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असते.तासनतास या बोगदे परिसरातील वाहतूकीच्या कोंडीत वाहने अडकून पडत असतात.यामुळे वेळेचा अपव्यय होऊन पेट्रोलची मोठी नासाडी होत असते.परिनामी वाहनधारकांची मोठी कुंचबना होत असते.या जाचातून वाहनधारकांची कायमचीच सुटका होण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा.गोडसे प्रयत्नशील आहेत.
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना खा.गोडसे यांनी नॅशनल हायवे प्रशासनाला दिले होत्या.राणेनगर, इंदिरानगर येथील बोगदे शिवारात वाहतुकीची कोंडी का होते याचे कारणे शोधून या विषयीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविला होता.सदर प्रस्तावाच्या मंजुरीसाठी खा.गोडसे यांनी वेळोवेळी दिलीत जाऊन केंद्रीयमंत्री ना.गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आज मंत्री गडकरी विकास कामांच्या भुमिपुजनासाठी इगतपुरी येथे आले असता त्यांनी वरील प्रस्तावास मान्यता दिल्याची घोषणा केली. यामुळे आता दोन्ही ठिकाणच्या बोगद्यांची लांबी मागील आणि पुढील बाजूने प्रत्येकी साडे सात मिटरने वाढणार आहे. आजमितीस प्रत्येक बोगदयाची लाबी पंचवीस मीटर इतकी असून लवकरच सदर लांबी चाळीस मीटर इतकी होणार आहे.याकामी सुमारे सव्वासे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आता लवकरच बोगद्यांची लांबी वाढविण्याच्या आणि रॅम्पच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. या दरम्यानच्या महामार्ग आणि सव्हिसरोडवरील वाहतूकीच्या कोंडीतून शहरवासियांची सुटका होणार असल्याची माहिती आणि खासदार गोडसे यांनी दिली आहे.
Nashik Indira Nagar Rane nagar Underpass Widening
Mumbai Agra Highway Road Flyover