अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे विविध पडसाद उमटत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी पाटील यांना लक्ष्य केले आहे. तसेच, पाटील यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रतिक्रीया दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे आज सकाळी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अनेक भागात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटलांच्या विधानाविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवर बोललो आहे. चंद्रकांत पाटील यांनी मला सांगितलं की, माझं वक्तव्य हे बाळासाहेबांविषयी नाही तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविषयी होते. बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे कार्य हे जगजाहिर आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले.
बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले…
https://twitter.com/mieknathshinde/status/1645688280695062529?s=20
CM Eknath Shinde Call to Minister Chandrakant Patil