शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एकनाथ शिंदेंनी राज्यपालांना पहिल्यांदाच लिहिले पत्र; केली ही मागणी; राज्यपाल काय निर्णय घेणार?

सप्टेंबर 3, 2022 | 2:31 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Shinde Koshyari e1662195161886

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकार बदलले की निर्णय बदलतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या १२ जागांसाठी राज्यपालांकडे पाठवलेली यादी आता बाद होणार आहे. परिणामी या यादीतील सदस्यांचे आमदार होण्याचे स्वप्न हवेतच विरणार आहे. त्यातच यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

विधान परिषदेवर नियुक्ती व्हावी म्हणून अनेक इच्छुकांची धावपळ सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे विधान परिषदेसाठी १२ सदस्यांची नावे पाठवलली. हे सरकार सत्तेवरून पायउतार झाले पण राज्यपालांनी त्या यादीला मंजुरी दिली नाही. आता राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ही यादी परत मागवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राज्यपालांकडे नव्याने यादी पाठवली जाणार आहे.

देशात ६ राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत. विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेत किमान 40 सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत.

महाराष्ट्राचे विधान मंडळात २८८ एकूण आमदार विधानसभेचे आहेत.तर ७८ सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे. त्यापैकी 5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. तर 1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात. परंतु प्रत्यक्षात राजकीय सोय पाहून सत्ताधारी पक्ष १२ जणांची यादी राज्यपालांकडे नियुक्तीसाठी पाठवतो. त्याला राज्यपाल मंजुरी देतात किंवा त्यात बदल सुचवू शकतात. परंतु मागील सरकारने पाठवलेली बारा नावांची यादी राज्यपालांनी ठेवून घेतली. पण, त्यास मंजुरी दिली नाही.

राज्यपाल नियुक्त सभासदांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विधान परिषदेत नव्या सरकारच्या सदस्यांची संख्या वाढावी आणि यानिमित्ताने विधिमंडळ कामकाजात सरकारच्या निर्णयांना आडकाठी येऊ नये, यासाठीच ही सर्व खेळली असल्याचे बोलले जाते.
महाविकास आघाडीची १२ सदस्यांची यादी रद्द होणार का? याची चर्चा सुरू आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे. शिंदे यांचे राज्यपालांना लिहिलेले हे पहिलेच पत्र आहे. या पत्रातून शिंदे यांनी महाविकास आघाडीला धक्का देणारी एक सूचना राज्यपालांना केली आहे.

महाविकास आघाडीने सादर केलेली विधान परिषदेच्या 12 सदस्यांची यादी रद्द करा. आम्ही नवी यादी पाठवणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. मात्र या पत्रावर राज्यपालांनी अजून काही निर्णय घेतलेला नाही. मात्र, राज्यपाल जुनी यादी रद्द करून नवी यादी स्वीकारतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या या पत्रावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 12 सदस्यांच्या या यादीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या सूचना कोर्टाने दिलेल्या आहेत. त्यामुळे ती यादी रद्द करता येणार नाही. हा कॅबिनेटचा निर्णय होता. त्यामुळेच यादी रद्द करणं चुकीचं ठरणार आहे. तब्बल दोन वर्षापासून ही यादी पेंडिंग आहे. यादी रद्द केली तर राज्यपाल पक्षपाती असल्याचं सिद्ध होईल, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्तेवर आल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. पण, राज्यपालांकडून या यादीला ना हिरवा कंदिल देण्यात आला, ना यादी मंजूर केली जात नसल्याबाबत भाष्य केले. याप्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी यासाठी राज्यपालांच्या अनेकदा भेटी घेतल्या. मात्र तरीही सदस्यनियुक्तीच्या यादीची फाइल पुढे सरकली नाही.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतानाही उद्धव ठाकरे यांनी या १२ आमदारांच्या मुद्द्यावरून राज्यपालांना टोला लगावला होता. आता मात्र, राज्यात आलेल्या नव्या सरकारने या यादीच्या फाइलला गती देण्याचे ठरवले आहे. मात्र, ही गती उलट्या दिशेने देण्यात येणार असून, ही यादी परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परत मागववलेली यादी रद्द करीत शिंदे-फडणवीस सरकार राज्यपालांना नवी यादी पाठवणार आहे, असे सांगण्यात येते.

CM Eknath Shide Letter to Governor Bhagat Singh Koshyari
MLC Vidhan Parishad Politics 12 Members List

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना लस घेतल्याने मुलीचा मृत्यूः याचिकाकर्त्यांने सीरमकडे केली एवढ्या पैशांची मागणी

Next Post

अंदर – बाहर जुगार खेळणा-याविरुध्द पोलिसांची कारवाई, रोकड जप्त, गुन्हा दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
crime diary 2

अंदर - बाहर जुगार खेळणा-याविरुध्द पोलिसांची कारवाई, रोकड जप्त, गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011