इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थान विधानसभेत आज एक मोठी घटना घडली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, ते गेल्या वर्षीचाच अर्थसंकल्प वाचला. अखेर ही गंभीर बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. पण, विरोधकांनी खुपच गोंधळ घातला. त्यामुळे या सर्व प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना भाषण सुरू होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. सरकारने अर्थसंकल्प लीक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील जुन्या ओळी वाचून दाखवल्या. दुसरीकडे येथे प्रचंड गदारोळ झाल्यानंतर विरोधी सदस्य सभागृहाच्या वेलमध्ये आले आणि विरोधकांचा गदारोळ पाहता सभापती सीपी जोशी यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
राजस्थान विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करताच ते म्हणाले की, कामात सत्यता असेल तर काम यशस्वी होईल, प्रत्येक संकट दूर होईल, आज नाही तर उद्या होईल. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील घोषणांचे वाचन सुरू केले.
खरं तर, राजस्थान विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत अचानक अडखळले. गेहलोत यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली आणि काही वेळाने ते बजेट वाचताना अडखळल्याची माहिती आहे. १२५ दिवसांच्या शहरी रोजगार हमी योजनेची माहिती अर्थसंकल्पात येताच गेहलोत यांना चूक लक्षात आली.
यादरम्यान मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन ही चूक सांगितली. मुख्यमंत्री वाचत असलेला अर्थसंकल्प हा गेल्यावेळचा आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आणि चुका होतात असे सांगितले. तर दुसरीकडे अर्थसंकल्पीय पेपरमध्ये जुनी अर्थसंकल्पीय कागदपत्रे आलीच कशी असा सवाल विरोधकांनी विचारला. भाजप नेते गुलाबचंद कटारिया म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचले आहे.
https://twitter.com/rishibagree/status/1623934229162909696?s=20&t=uAlISpWbirkR14gliLt6uQ
CM Ashok Gehlot Present Last Year Budget in Assembly Session