नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल अर्धा डझन मंत्री आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदींचा त्यात समावेश आहे.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गोपिनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे लोकार्पण आज होणार आहे. या सोहळ्यासाठी हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑटो अँड लॉजिस्टिक समिटसह विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा अतिशय कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खासकरुन नाशिक-पुणे मार्गावर पोलिसांची संख्या लक्षणीय आहे. सुरक्षेच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
https://twitter.com/OfficeOfNG/status/1636759805116444672?s=20
CM and 6 Ministers today on Nashik Tour