माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
येते काही दिवस हवामान अंदाज नक्की कसा असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण, अवकाळी पावसाविषयी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता आपण पुढील काही दिवसांचे हवामान नक्की कसे असेल त्याविषयी जाणून घेऊ…
सोमवार दि.१३ ते शुक्रवार दि.१७ मार्च पर्यंत पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वीजा, गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः १५ ते १७ मार्चच्या दरम्यान वातावरणाची तीव्रता अधिक जाणवते. प्रत्यक्षात पावसापेक्षा वातावरणाचे काहूरच अधिक जाणवेल. त्या आठवड्याच्या काळात दिवसाच्या कमाल तापमानातही २ डिग्रीने घट होण्याची शक्यता जाणवते.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1634460594987315200?s=20
जमिनीपासून साधारण ३ ते ७.५ किमी अशा साडेचार किमी हवेच्या जाडीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशापर्यन्त हवेच्या कमी दाबाचा पट्टा जाणार आहे. या पट्ट्यामुळे अरबी व बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेच्या संयोग व उर्ध्वगामितेमुळे इतर राज्याबरोबर महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवते.
शेतकऱ्यांनी विशेष घाबरून न जाता १५-१७ मार्च पर्यन्त वातावरण निवळणीच्या सापटीतून पीक काढणीचा उरक साधवावा, असे वाटते.
वातावरणीय विशेष एव्हढेच!
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1634490186053844994?s=20
Climate Weather Forecast Unseasonal Rainfall