सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी MTDCच्या या आहेत खास ऑफर्स

डिसेंबर 21, 2022 | 5:03 am
in राज्य
0
Grape resort1 e1671545998862

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) पर्यटकांना सर्वोत्तम सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी सज्ज झाले असून आरक्षणासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. निवासी आरक्षण http://www.mtdc.co या संकेतस्थळावर सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे देण्यात आली आहे.

जेष्ठ नागरिकांसाठी २० टक्के, शासकिय – कर्मचारी यांना आगाऊ आरक्षणासाठी १० ते २० टक्के सवलत आहे. आजी – माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. समूह आरक्षणासाठी २० खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे देण्यात आली आहे.

औरंगाबाद विभागातील अजंठा (फर्दापुर), लोणार, नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही पर्यटकांची मुख्य आकर्षण ठरत असून आतापर्यंत ९० टक्के आरक्षण झाले आहे.

पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीती वेबसाईट, फेसबुक आणि व्हाट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. स्थानिक कला, संस्कृती आणि परंपरा यांचा अनुभव घेता यावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देतानाच पर्यटक निवासांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचा मानस असुन स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. पर्यटक निवासाच्या १०० किमीच्या परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येणार आहे.

पर्यटकांना उत्तम सुविधा द्या : व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे एकुण ३० निवास आणि उपहारगृह यांचे परिचालन होत आहे. महामंडळाच्या कर्मचारी वर्गाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आज महामंडळाची ख्याती साऱ्या भारतभर पसरली आहे. केवळ महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशभरातुन असंख्य अतिथी पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येत असतात. पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा पुरविल्या जाव्यात, अशा सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा यांनी दिल्या आहेत.

सोयी – सुविधा
पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करीत उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहुन प्री – वेडींग फोटोशुट आणि डेस्टीनेशन वेडींगचीही सोय करण्यात येणार आहे.

वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेअंतर्गत काही रिसॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र नियोजन करण्यात येत आहे. पर्यटनाबरोबरच पर्यावरण आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा जपत पर्यटनाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी केले आहे.

Christmas New Year Celebration MTDC Offers

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – तुम्हाला न आवडणारे काम

Next Post

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर; बघा, विजेत्यांची संपूर्ण यादी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Ganpati Ganesh 1

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर; बघा, विजेत्यांची संपूर्ण यादी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011