नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या या कठीण काळात चीनकडून एक विचित्र प्रयोग राबिवला जाणार आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्यांना सुपर किड बनविण्याची इच्छा आहे, मुलांना प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्याची इच्छा असेल अशा पालकांनी चिकन पॅरेंटिंग प्रक्रिया राबवावी लागेल, असे चीन सरकारने म्हटले आहे.
चीनच्या चिकन पॅरेंटिंग योजनेअंतर्गत मुलांना कोंबड्यांच्या रक्ताचे इंजेक्शन द्यावे लागणार आहे. असे केल्याने मुलांच्या आरोग्याविषयी सगळ्या तक्रारी दूर होतील, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे वंध्यत्व, कर्करोग आणि केस गळण्याच्या समस्याही दूर होऊ शकते. सिंगापूर पोस्टच्या वृत्तानुसार, चिकनच्या रक्तात स्टेरॉयड असते. ते मुलांना अभ्यासासह खेळामध्ये चांगली कामगिरी करण्यास मदत करते.
या वृत्तात दावा केला आहे की, बीजिंग, शांघाई आणि गुवांगझूमध्ये चिकन बाळाची वेगळी ओळख आहे. अमेरिकेतील हेलिकॉप्टर पॅरेंटिंगसारखेच चिकन पॅरेंटिंग आहे. यामध्ये मुलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रशिक्षण दिले जाते. फक्त अभ्यास आणि चांगले गुण मिळणे एवढेच महत्त्वाचे नाहीये. त्याव्यतिरिक्त मुलांना पुढे येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
नॅशनल मेंटल हेल्थ डेव्हलपमेंटच्या माहितीनुसार, २०१९-२० मध्ये चीनचे २५ टक्के मुले नैराशाने ग्रासले होते. ७.४ टक्के मुले गंभीर नैराश्याने ग्रासले होते. चीनमधील मुलांना जगात सर्वाधिक दृष्टिदोषाची समस्या आहे. ७१ टक्के माध्यमिक आणि ८१ टक्के उच्च माध्यमिक वर्गातील मुलांची दृष्टी कमी झाल्याच्या तक्रारी आहेत.