मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडून मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण केले आहे. शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. तब्बल ४०च्या आसपास आमदारांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सायंकाळच्या सुमारास फेसबुक लाईव्ह द्वारे शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला.
मला कुठल्याही पदाचा मोह नाही. मुख्यमंत्री पद त्यागण्यास मी तयार आहे, शिवसेना पक्ष प्रमुख पदही सोडण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात नाराज आमदारांनी प्रत्यक्ष संवाद साधण्याची विनंती त्यांनी केली. तसेच, थोड्याच वेळात मी वर्षा हे निवासस्थान सोडून मातोश्रीवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार, उद्धव यांनी सर्व सामानासह वर्षा बंगल्याला निरोप दिला आणि कलानगरमधील मातोश्री निवासस्थान गाठले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक वर्षा बंगल्याबाहेर उपस्थित होते. उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
बघा तेथील क्षणाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1539646129339772928?s=20&t=u4simUNJ_yj7FDfRTmu6NQ
chief minister uddhav thackeray left varsha bungalow today shivsena maharashtra political crisis